मोड आलेल्या 'या' भाज्यांचे सेवन केल्यास शरीरात तयार होतील विषारी तत्व
दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात फळे, भाज्या, सुका मेवा आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील सर्वच अवयव निरोगी राहतात. निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यात उगवलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आणलेल्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या जातात. भाज्यांमधील कीड, मोठं मोठ्या अळी शरीरात गेल्यानंतर मेंदूमध्ये जातात. त्यामुळे घरी आणलेल्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.(फोटो सौजन्य – istock)
पोषक आहारात पालेभाज्या, कडधान्य, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा हेच पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. बाजारातून विकत आणलेल्या भाज्या जास्त वेळ तशाच पडून राहिल्यानंतर त्यांना हळूहळू मोड येतो. मोड आलेल्या भाज्या बनवलेल्या जातात. पण आहारात मोड आलेल्या भाज्यांचे अजिबात सेवन करू नये. मोड आलेल्या भाज्यांमध्ये विषारी घटक तयार होतात, के घटक पोटात गेल्यानंतर आतड्यांमध्ये किंवा पोटात विष तयार होण्याची जास्त शक्यता असते. अशा भाज्यांच्या सेवनामुळे उलट्या, मळमळ होऊ शकते. चला तर जाणून घेऊया मोड आलेल्या कोणत्या भाज्या खाऊ नयेत.
जेवणात वापरला जाणारा अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे कांदा. कांद्याशिवाय जेवणाला व्यवस्थित चव लागत नाही. कांद्याच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. पण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात कांदे आणून ठेवले जातात. हे कांदे मोठ्या भांड्यात किंवा गोणी भरून ठेवले जातात. त्यामुळे कांद्यांना मोड येण्याची जास्त शक्यता असते. मोड आलेले कांदे कापून खाल्ले जातात. मोड आलेल्या कांड्यांमध्ये अल्कलॉइड खासकरून एन-प्रोपाइल डायसल्फाइडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. तसेच यामुळे हेमोलिटिक अॅनीमिया होऊ शकतो.
लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
डाळ किंवा भाजीला फोडणी देताना लसूणचा वापर केला जातो. लसूणच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. पण मोड आलेला लसूण अजिबात खाऊ नये. यामुळे पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवून उलट्या, मळमळ किंवा लाल रक्तपेशींना हानी पोहचते. शरीरासाठी लाल रक्तपेशी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे मोड आलेली लसूण खाऊ नये.
मोड आलेल्या भाज्या का खाऊ नये?
मोड येण्याची प्रक्रिया उघड्यावर किंवा अस्वच्छ स्थितीत झाल्यास, बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. बटाट्याला मोड आल्यावर सोलानिन आणि चाकोनिन नावाचे विषारी घटक तयार होतात, जे विषारी असू शकतात आणि ते खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
मोड आलेल्या भाज्या खाताना काय काळजी घ्यावी?
मोड येण्याची प्रक्रिया स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी करावी. मोड आलेली कडधान्ये चांगली शिजवून खावी, ज्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतील.