
शिल्लक राहिलेला भात सतत गरम करून खाता? फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या भात शिजवण्याची पद्धत
भात शिजवण्याची पद्धत?
सतत गरम केलेला भात खाण्याचे तोटे?
अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
भारतीय जेवणाच्या ताटात कायमच भात हा पदार्थ आवर्जून पाहायला मिळतो. भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे अजिबात वाटतं नाही. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणातील शिल्लक राहिलेला भात सकाळी गरम करून खाल्ला जातो. तर काहीवेळा भाताचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात बनवला जातो. पण हा भात योग्य पद्धतीने बनवला नाहीतर शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शिजवलेला भात सतत गरम करून खाणे शरीरासाठी धोक्याचे आहे. आपल्यातील अनेकांना कायमच वाटते रात्रीच्या जेवणात उरलेला भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही, पण असे नसून सतत गरम केलेल्या भातामुळे फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांसंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया शिल्लक राहिलेला भात गरम करून खाल्ल्यास उद्भवणाऱ्या समस्या आणि भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत रात्रीच्या जेवणार शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेला फोडणीचा भात खायला खूप जास्त आवडतो. पण यामुळे शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. तांदळामध्ये बॅसिलस सेरियस नावाचे जिवाणू आढळून येतात. हे जिवाणू इतके घातक असतात की भात शिजवताना पुन्हा जिवंत होण्याची शक्यता असते. शिजवलेला भात बराच वेळ सामान्य खोलीच्या तापमानामध्ये ठेवला जातो. यामुळे त्यातील बीजाणू जिवाणूंमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेमध्ये जिवाणू विष तयार करतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
शिल्लक राहिलेला भात कितीही गरम केला तरी त्यातील जिवाणू नष्ट होत नाही. हे विष पोटात गेल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. तसेच हा भात १ ते २ तास बाहेर राहिल्यास किंवा दमट किंवा उष्ण ठिकाणी साठवून ठेवल्यास, सतत गरम केल्यास भातामधील जिवाणू आणखीनच वाढू लागतात. ज्याचा आतड्यांवर लगेच परिणाम दिसून येतो.
खराब अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर १ ते ५ तासांच्या आतमध्येच मळमळणे आणि उलट्या होण्यास सुरुवात होते. अन्नपदार्थांवाटे शरीरात विष जाते. याशिवाय ते १५ तासांनी जुलाब, पोटात पेटके येणे, याशिवाय सतत जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे ताप येण्याची शक्यता असते. वय वाढल्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता कमी होऊन जाते आणि शरीराला गंभीर आजाराची लागण होते. अन्नपदार्थांतून विषबाधा झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. भात शिजवताना १ तासाच्या आत थंड करा. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाऊ नये.
Ans: होय. वारंवार गरम केलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.
Ans: शिजवलेला भात जास्त वेळ रूम टेम्परेचरवर ठेवणे टाळावे. शक्यतो १ ते २ तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवणे सुरक्षित मानले जाते.
Ans: भात पूर्णपणे गरम झाला आहे याची खात्री करावी आणि एकाच भाताला वारंवार गरम करणे टाळावे.