Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Corn Chilli Cheese Toast Recipe: तुम्हालाही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट आणि टेस्टी स्नॅक्स बनवायचे असले तर ही कॉर्न चीली चीज टेस्ट रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 08:44 PM
Photo- Ai generated

Photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • चहासोबत काहीतरी चटपटीत हवंय?
  • झटपट बनवा कॉर्न चिली चीज टोस्ट
  • १५ मिनिटांत झटपट तयार होईल

संध्याकाळची भूक लागली की चहा किंवा कॉफीसोबत काहीतरी चटपटीत आणि स्वादिष्ट खावेसे वाटते. रोज बिस्किटे, चिप्स किंवा बाहेरचे फास्ट फूड खाण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी काहीतरी झटपट आणि चविष्ट स्नॅक कॉर्न चिली चीज टोस्ट तयार करु शकता. ब्रेड, स्वीट कॉर्न, तिखट हिरवी मिरची आणि भरपूर चीजचे मिश्रणाने तयाह होणारा हा टोस्ट काही मिनिटांत तयार करता येतो. कॉर्नचा हलका गोडवा, मिरचीची झणझणीत चव आणि वितळलेल्या चीजचा स्वाद यामुळे हा टोस्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतो. विशेष म्हणजे, यासाठी लागणारे साहित्य सहज घरात उपलब्ध असते आणि जास्त वेळही लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात, कॉर्न चीली चीज टोस्टची सोपी रेसिपी.

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

कॉर्न चिली चीज टोस्टसाठी साहित्य

  • ४ ब्रेड स्लाइस
  • १ कप उकडलेले स्वीट कॉर्न
  • १ कप किसलेले चीज
  • १ ते २ हिरव्या मिरच्या
  • १ छोटा कांदा
  • अर्धा चमचा चिली फ्लेक्स
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार बटर किंवा तेल

कॉर्न चीज टोस्ट बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले स्वीट कॉर्न घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले चीज, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्या. चीज आणि कॉर्न सर्व मिश्रणात नीट मिक्स करा.आता ब्रेडचे स्लाइस घ्या. प्रत्येक स्लाइसवर तयार केलेले कॉर्न-चीजचे मिश्रण समान प्रमाणात पसरवा. मिश्रण ब्रेडच्या कडांपर्यंत हलक्या हाताने पसरवल्यास प्रत्येक घासात कॉर्न आणि चीजची चव मिळते.यानंतर, तवा गरम करून त्यावर थोडे बटर लावा. त्यानंतर मिश्रण लावलेली बाजू वर ठेवून ब्रेड तव्यावर ठेवा आणि मंद आचेवर भाजा. ब्रेडचा खालचा भाग सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यानंतर टोस्ट उलटा. चीज वितळेपर्यंत आणि ब्रेड दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तयार टोस्ट गरमागरम सर्व्ह करा.कॉर्न चिली चीज टोस्ट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा तुमच्या आवडीच्या डिपसोबत सर्व्ह करा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठीही हा पदार्थ झटपट तयार करता येतो.

टीप: चीजमध्ये मीठ असल्यामुळे मिश्रणात मीठ घालताना प्रमाणाची काळजी घ्या.

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Web Title: Corn chilli cheese toast recipe 15 minute evening snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • sweet corn

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
1

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
2

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.