
कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग 'या' पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी
Amla Candy Recipe: शरीरासाठी आवळा सुपरफूड मानला जातो. दैनंदिन आहारात नियमित एक आवळा खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. आवळ्याच्या सेवनामुळे त्वचा, केसांना खूप जास्त फायदे होतात. वाढलेले वजन कमी करताना आहारात आवळ्याचा समावेश करावा. पण कच्चा आवळा खायला अनेकांना आवडत नाही. आवळ्याच्या तुरट चवीमुळे आवळा खाण्याचा खूप जास्त कंटाळा केला जातो. त्यामुळे कच्चा आवळा खायला नको असल्यास या सोप्या पद्धतीमध्ये आवळा कँडी बनवू शकता. या पद्धतीने बनवलेली आवळा कँडी चवीला अतिशय सुंदर लागते. आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात विटामिन सी असते. विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. आवळ्यामधील फायबर पचनक्रिया सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुद्धा सुटका मिळवून देते. चला तर जाणून घेऊया आवळा कँडी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)