
थंडीत शरीराला मिळेल भरपूर पोषण! सकाळच्या नाश्त्यात बनवा दुधी भोपळा शेवग्याचे सूप, नोट करा रेसिपी
Winter Special Recipe: राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे थंड वारे वाहू लागले आहेत. थंड वातावरणात शरीराची जास्त काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्यात तिखट किंवा तेलकट पदार्थ बनवून खाण्याऐवजी सूप किंवा शरीरात उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच टोमॅटो सूप खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट दुधी भोपळा आणि शेवग्याचे सूप बनवू शकता. दुधी भोपळा शरीरासाठी फायदेशीर आहे. हा पदार्थ पचनाला अतिशय हलका आणि पोटासाठी आरामदायी आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तिखट किंवा चहा बिस्कीट खाण्याऐवजी सूप प्यावे. चला तर जाणून घेऊया दुधी भोपळा आणि शेवग्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी