Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोरोनरी आर्टरी डिसिजचा अनेकांच्या जीवाला धोका! ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच करा उपचार

हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 01:53 PM
वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोरोनरी आर्टरी डिसिजचा अनेकांच्या जीवाला धोका! 'ही' लक्षणे दिसताच वेळीच करा उपचार

वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोरोनरी आर्टरी डिसिजचा अनेकांच्या जीवाला धोका! 'ही' लक्षणे दिसताच वेळीच करा उपचार

Follow Us
Close
Follow Us:

हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?
हार्ट ब्लॉकेज होण्याची कारणे?
धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदय कायमच निरोगी आणि सक्रिय असणे फार गरजेचे आहे. पण हृदयाचं बंद पडले तर संपूर्ण शरीर बंद करण्याची जास्त शक्यता असते. हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचणार नाही, याची कायमच काळजी घ्यावी. हृदय शरीरातील रक्त सतत पंप करते, ज्यामुळे संपूर्ण शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो आणि तुम्ही कायमच निरोगी राहता. पण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे किंवा जीवनशैलीत केलेल्या चुकांमुळे हृदयाचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत कोरोनरी आर्टरी डिसिज असे म्हंटले जाते. त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा कोरोनरी आर्टरी डिसिजची लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ फायबरयुक्त पदार्थ, बद्धकोष्ठता होईल दूर

हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमण्यांमध्ये कोलेस्टेरॉल, फॅट आणि इतर तत्व जमा झाल्यानंतर रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या न झाल्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे धमन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होऊन जातो. आरोग्यासंबंधित या गंभीर स्थितीमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याची कारणे:

हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची अनेक विविध कारणे असू शकतात. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यामुळे व्यवस्थित रक्तप्रवाह होत नाही. ज्यामुळे प्रामुख्याने छातीत वेदना किंवा दबाव जाणवू लागतो. तर काहीवेळा उजवा हात, खांदा, मान, जबडा किंवा पाठीत वेदना पसरतात. काहींना चालण्यात, पायऱ्या चढण्यात अडचण निर्माण होते. थोडस चालल्यानंतर लगेच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. हा त्रास थोडावेळ आराम केल्यानंतर कमी झाल्यासारखा वाटतो.

वारंवार दम लागणे, जास्त थकवा, चक्कर येणे, मळमळ, थंड घाम येणे आणि अस्वस्थता ही हृदयविकाराच्या झटक्याची गंभीर लक्षणे आहेत. हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतात किंवा अनियमित सुद्धा होतात. ही समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. मधुमेह असलेल्या रुगणांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. रक्तात वाढलेल्या साखरेचा परिणाम हृदयावर होण्याची जास्त शक्यता असते. अपचन, पाठीत वेदना, घाबरलेपणा किंवा कमजोरी जाणवू लागल्यास कोणत्याही क्षणाचा विलंब न करता वेळीच उपचार करावेत, अन्यथा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.

रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची कारणे?

हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा इत्यादी कारणांमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. धूम्रपान धमण्यांमधील आतील थराचे गंभीर नुकसान करतो. या प्रक्रियांमुळे नसांमध्ये प्लॅक तयार होतो आणि हृदयाचे आरोग्य बिघडून जाते. शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, जास्त तळलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड, मानसिक तणाव इत्यादी कारणांमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हार्ट ब्लॉकेजची लक्षणे काय आहेत?

    Ans: छातीत दुखणेदडपण येणे किंवा अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे.

  • Que: हार्ट ब्लॉकेज का होतात?

    Ans: रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने, रक्तवाहिन्यांवर दाब पडल्यामुळे

  • Que: ब्लॉकेजवर उपचार काय आहेत?

    Ans: निरोगी आहार (कमी तेलकटमीठ)नियमित व्यायाम, कोलेस्टेरॉल कमी करणे (Statins)रक्त पातळ करणारी औषधे

Web Title: Coronary artery disease is a threat to many peoples lives due to increasing cholesterol get treatment as soon as these symptoms appear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • heart blockage
  • Heart Disease
  • heart problems

संबंधित बातम्या

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव
1

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर
2

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.