मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा 'हे' फायबरयुक्त पदार्थ
मूळव्याध म्हणजे काय?
मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी काय खावे?
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आहारात अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण सतत तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध वाढण्याची जास्त शक्यता असते. बद्धकोष्ठता झाल्यानंतर आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे गॅस, अपचन आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरतात. मूळव्याध हा बद्धकोष्ठतेमुळे उद्भवणारा गंभीर आजार आहे. पोट स्वच्छ न झाल्यामुळे किंवा शौचाच्या वेळी खूप जास्त जोर लावल्यामुळे मूळव्याध होतो. यामुळे गुदद्वाराच्या भागातील नसांना सूज येते. तसेच या नसांवर जास्तीचा तणाव आल्यामुळे रक्तस्त्राव आणि वेदना होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – istock/AI)
हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात ‘हे’ सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल
कमी पाण्याचे सेवन, तिखट पदार्थांचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. मूळव्याध हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. एका जागी तासनतास बसून राहणे, शौचास बसल्यावर जास्त जोर लावणे इत्यादी कारणांमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो तर काहीवेळा रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. मूळव्याध हा सायलेंट किलर आजार आहे. मूळव्याध झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणत्या फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे, चला तर जाणून घेऊया सविस्तर.
वारंवार मूळव्याध किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत असेल तर चिकन, मटण इत्यादी उष्ण पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. चिकन मटण पचवण्यासाठी आतड्याना जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित नसाल तर चिकन मटण सहज पचन होणार नाही. सतत अपचन झाल्यामुळे आणि पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. वाढत्या बद्धकोष्ठतेमुळे पुढे जाऊन मुळव्याधासारखे गंभीर आजार होतात. तसेच मांसाहार करणाऱ्या लोकांनी आहारात मासे व बलकशिवाय अंडी खावी.
Ans: शौचाच्या वेळी वेदना किंवा आग होणे, गुदद्वाराच्या भागात खाज किंवा जळजळ
Ans: जुनाट बद्धकोष्ठतेमुळे मलविसर्जनाला जोर लावावा लागतो.
Ans: आहारात हिरव्या पालेभाज्याफळे (पपईकेळी)आणि डाळींचा समावेश करा, दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या.






