रोहित शर्माच्या फिटनेसवर क्रिकेटप्रेमी फिदा! महिनाभरात घटवले तब्बल १० किलो वजन
जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्माचे नाव कायमच घेतले जाते. सर्वच क्रिकेट प्रेमींना त्याचा खेळ जितका आवडतो तितकाच त्याचा फिटनेस, लुक आणि मैदानाबाहेरील लुक सुद्धा खूप जास्त आवडतो. काही दिवसांपूर्वी रोहित काही कारणांमुळे चर्चेत आला होता. रोहित त्याच्या कर्णधारपदामुळे नाहीतर तर त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आला होता. त्याने स्वतःमध्ये केले बदल पाहून चाहते सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. रोहितने काही महिन्यांमध्ये तब्बल १० किलो वजन कमी केले. कर्णधारपद गेल्यानंतर पहिल्यांदाच तो एका कार्यक्रमात दिसला होता. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करून तो पुन्हा एकदा नव्या लुकमध्ये चाहत्यांसोमर आला आहे. रोहितने वजन कमी करताना योग्य डाएट फॉलो केले होते. याशिवाय आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करून वजन कमी केले. आज आम्ही तुम्हाला रोहितने वजन कमी करताना कोणत्या पदार्थांचे सेवन केले? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock, instagram)
रोहित शर्माच्या नवीन लुकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. वजन वाढल्यामुळे त्यांना अनेकांनी ट्रॉल करत टीका सुद्धा केली होती. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर केलेल्या टिकांना सडेतोड उत्तर दिले आहे. मागील महिनाभरात रोहितने तब्बल १० किलो वजन कमी केले. याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रोहित खूप जास्त फिट आणि आत्मविश्वासू दिसून आला आहे.
वजन कमी करताना आहारात खाल्ले पदार्थ महत्वपूर्ण भूमिका बजवतात. रोहितने वजन कमी करताना तो सकाळी लवकर ७ वाजता उठायचा. दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजता झाल्यानंतर भिजवलेले बदाम, सॅलड, ताज्या फळांचे रसाचे सेवन करून साधारण ९.३० वाजता तो नाश्त्यात ओट्स, फळे आणि दुधाचे सेवन करत असे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आवश्यक पोषणामुळे आरोग्य कायमच निरोगी राहते. दुपारी ११ वाजताच्या दरम्यान दही आणि बेसन चिल्ला खायचा. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी नियमित १ नारळ पाणी आणि नाश्त्यामध्ये आवर्जून दह्याचे सेवन करून नाश्ता करायचा.
रोहित शर्मा दुपारच्या आहारात अतिशय हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करायचा. यामध्ये भाज्या, कढी, डाळ, भात आणि कोशिंबीर इत्यादी पदार्थ तो नियमित खायचा. दुपारच्या जेवणांनंतर संध्याकाळी ५ च्या आसपास फळांची स्मूदी किंवा ताज्या फळांचे सेवन करत असे. सुकामेवा आणि फळांची स्मूदी प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते. त्यानंतर रात्रीच्या जेवणात पनीर, पुलाव, भाजीपाला सूप आणि भाज्या इत्यादी पौष्टिक पदार्थ खायचा.