महिलांच्या आरोग्यासंबंधित रोजची दुखणी होतील कायमची दूर! आहारात नियमित करा खारीकचे सेवन
सर्वच महिलांना आरोग्यासंबंधित एक नाहीतर असंख्या समस्या उद्भवतात. मासिक पाळीच्या वेदना, हार्मोन्सचे असंतुलन, कामाचा तणाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाच्या वाढलेल्या तणावामुळे आणि नातेसंबंधांमुळे महिला कायमच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील. नियमित सुकामेवा खाल्ला जातो. काजू, बदाम, काळे मनुके किंवा पिस्त्याचे कधीतरी सेवन केले जाते. पण महिलांनी नियमित खारीक खावी. महिलांच्या आरोग्यासाठी खारीक वरदान ठरते.(फोटो सौजन्य – istock)
खारीक हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी मानला जातो. खारीकची पावडर दुधात मिक्स करून खाल्ली जाते. दुधात खारीक मिक्स करून खाल्ल्यास ते सहज पचन होते. त्यामुळे महिलांनी नियमित एक चमचा खारीक खावी. आज आम्ही तुम्हाला एक चमचा खारीक खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. खारीक महिलांसाठी वरदान ठरते. यामध्ये असलेले पौष्टिक घटक शरीराला ऊर्जा देतात.
खारीक सुकवल्यानंतर ते अतिशय कडक होऊन जाते. त्यामुळे खारीक चावताना दात दुखतात. खारीकची तुम्ही पावडर करून किंवा असेच खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. याशिवाय खारीकमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात नेहमीच खारीकचे सेवन करावे. यामध्ये विटामिन ए, बी आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. रक्तात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खारीक खावे. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमित खारीक खावे.
महिलांची हाडे मोठ्या प्रमाणावर झिजतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम युक्त पौष्टिक पदार्थांचे नियमित सेवन करावे. हाडांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा किंवा हाडांमधील वेदना वाढू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी खारीक खावे. यामध्ये असलेले कॅल्शियम व फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. कमकुवत हाडांना पोषण देण्यासाठी खारीक खावी.
चुकीच्या वेळी जेवल्यामुळे किंवा तिखट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या वाढू नये म्हणून दुधात खारीक पावडर मिक्स करून खावी. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच केस आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी खारीक अतिशय प्रभावी ठरते.
महिलांच्या आरोग्यासाठी काही विशेष आरोग्यविषयक चिंता कोणत्या आहेत?
उत्तर: महिलांना एचआयव्ही/एड्सचा धोका अधिक असतो. त्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरणारे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आहेत, ज्यामुळे त्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही.
महिलांच्या आरोग्यासाठी कोणत्या सामाजिक-सांस्कृतिक घटकांमुळे अडथळे येतात?
उत्तर: अनेक समाजात भेदभाव आणि सामाजिक-सांस्कृतिक घटक महिलांना दर्जेदार आरोग्य सेवांपासून दूर ठेवतात. यामुळे त्यांना आरोग्य सेवांचा लाभ घेता येत नाही आणि आरोग्याच्या सर्वोत्तम पातळीवर पोहोचता येत नाही.
खारीक पावडरचे फायदे:
खारीक पावडर साखरेला एक आरोग्यदायी पर्याय आहे, जी पदार्थांना नैसर्गिक गोडवा देते. यात लोह, कॅल्शियम, तांबे आणि जीवनसत्त्वे ( व्हिटॅमिन बी) यांसारख्या खनिजांचा उत्तम स्रोत आहे, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.