Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ५० व्या वर्षी शरीरात थकवा जाणवतो? मग फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, कधीच होणार नाही आजार

वाढत्या वयात शरीराला पोषण देण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 11:40 AM
वयाच्या ५० व्या वर्षी शरीरात थकवा जाणवतो? मग फिट राहण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी, कधीच होणार नाही आजार

वयाच्या ५० व्या वर्षी शरीरात थकवा जाणवतो? मग फिट राहण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी, कधीच होणार नाही आजार

Follow Us
Follow Us:

वयाची पन्नाशी ओलांडली की शरीरात अनेक नैसर्गिक बदल होऊ लागतात. पचनशक्ती मंदावते, हाडे आणि स्नायू कमकुवत होतात, विविध प्रकारच्या व्याधी जडण्याची शक्यता असते. मात्र, जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत थोडे बदल केले, तर पन्नाशीनंतरही तुम्ही विशी-तिशीसारखे उत्साही आणि फिट राहू शकता. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पन्नाशीनंतर काही निरोगी सवयी पाळणाऱ्या लोकांना आजार होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे उत्तारवयात तुम्ही सुद्धा त्या सवयी नक्की पाळायला हव्यात.(फोटो सौजन्य – istock)

सुटलेल्या पोटामुळे कंबरेचा भाग जाड दिसतो? नियमित चावून खा हिरव्यागार कढीपत्त्याची पाने, महिनाभरात दिसतील बदल

आहार:

आपण जे खातो त्याचाच आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) नुसार, अमेरिकेत हृदयरोगामुळे चारपैकी एकाचा मृत्यू होतो. तर लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि असंतुलित आहार ही अकाली मृत्यूची मुख्य कारणे ठरत आहेत. पन्नाशीनंतर शरीराची ऊर्जेची गरज कमी होते, पण शरीराला पोषण हवे असते. त्यामुळे शराराला पोषण हवे असते. त्यामुळे पौष्टिक पदार्थ आहारात समाविष्ट करा. जास्त साखर, मीठ, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा. घरी बनवलेले ताजे अन्न, फळे, भाज्या घ्या.

वजन नियंत्रणात ठेवा:

जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला वयानुसार विविध आजारांचा धोका असू शकतो. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीस्टोन, श्वसनाच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून पन्नाशीनंतर प्रत्येकाने वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.

तपासणी:

सर्वांत महत्त्वाची सवय म्हणजे आरोग्य तपासणी. उत्तारवयात नियमितपणे, आरोग्य तपासणी करणे। गरजेचे आहे. यात प्रामुख्याने रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची तपासणी करावी. यामुळे शरीरात झालेले बदल, कमतरता लक्षात येतात आणि वेळीच त्यावर उपचार घेण्यासाठी मदत होते.

मानसिक आरोग्य जपा:

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर किंवा मुलाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर एकाकीपणा जाणवू शकतो. यामुळे छंद जोपासा, मित्रांशी संवाद साधा, ध्यान करा, तसेच धूम्रपान आणि मद्यपानसारख्या सवयी तुमचे यकृत आणि फुफ्फुसांसाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे वेळीच या सवयी सोडा.

झोप आणि पाणी:

पन्नाशीनंतर अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतो. मात्र शरीरासाठी ७-८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. तसेच दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याची खात्री करा. यामुळे किडनीचे कार्य सुधारते.

महिलांना मानसिकरित्या तोडतो Menopause, डॉक्टरांनी सांगितले 40 व्या वर्षानंतर का होतात चिडक्या आणि रागीट

व्यायाम:

पन्नाशीनंतर शारीरिकदृष्ट्‌या सक्रिय असणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करावा. यामुळे वजन नियंत्रित राहते, दिवसभर ऊर्जा मिळते, शरीर सक्रिय राहते आणि पचनक्रियाही सुधारते. लक्षात ठेवा जड व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही सूर्यनमस्कार, वॉकिंग, सायकलिंग केल्यास फायदा होतो. याशिवाय योगा केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Health care tips fatigue at age 50 then follow these habits to stay fit you will never get sick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • health care news
  • Healthy Foods
  • healthy heart

संबंधित बातम्या

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
1

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे
2

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला
3

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.