स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाने नियमित करा मसाज
कामाचा वाढलेला तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज आणि रुक्ष वाटू लागतो. कितीही झोप पूर्ण केली तरीसुद्धा डोळे फ्रेश दिसत नाही. डोळ्यांखाली वाढलेल्या काळेपणामुळे डोळ्यांच्या खालील त्वचेवर कोरडेपणा येतो. डार्क सर्कल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशनचा वापर केला जातो. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखाली आलेले काळे डाग निघून जात नाही. डोळ्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे डोळ्यांच्या खालील त्वचेला कोणतेही प्रॉडक्ट लावताना ते डोळ्यांना सूट होईल की नाही याची खात्री करून मगच प्रॉडक्ट लावावे. तासंतास स्क्रीनकडे पाहणे, अपुरी झोप, ताण-तणाव, वाढलेले वय इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – pinterest)
डोळ्यांच्या खाली आलेले काळे डाग सुरुवातीला अतिशय सौम्य असतात. मात्र कालांतराने ते आणखीनच गडद होतात. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही हानिकारक स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थाचा वापर करून डोळ्यांखालील त्वचा उजळदार करावी. प्रत्येकाच्या घरात तूप उपलब्ध असते. तुपाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यासोबतच गोड पदार्थ बनवताना आवर्जून तूप वापरले जाते. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले तूप औषधी आहे. यामुळे त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तुपाचा वापर करावा.
डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा काळी झाल्यानंतर संपूर्ण चेहरा निस्तेज वाटू लागतो. अशावेळी रात्री झोपताना डोळ्यांच्या खाली तुपाचा मसाज करावा. यासाठी बोटांवर तूप घेऊन डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने मसाज करावा. ५ ते १० मिनिटं मसाज केल्यानंतर झोपावे. यामुळे रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. महिनाभर नियमित डोळ्यांवर तुपाचा मसाज केल्यास काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल आणि तुमची त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल.
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान
सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा तुपाचे सेवन केल्यास आतड्यांमधील हालचाली सुधारतील. पोटात वाढलेला गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळेल. तुपामध्ये विटामिन सी, के, डी, ई इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. याशिवाय ओमेगा – ३ फॅटी ॲसिड्स त्वचेवर आलेली सूज कमी करतात आणि त्वचा सुंदर करण्यासाठी मदत करतात. तुपामध्ये असलेल्या नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे थकलेली त्वचा रिलॅक्स होऊन चमकदार आणि मऊ होते.