या' दोन पदार्थांचा वापर करून तयार करा घरगुती फेस सीरम
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या विटामिन सी सीरमचा वापर केला जातो, तर कधी त्वचेवर पिंपल्स आणि डाग घालण्यासाठी सीरम लावले जाते. त्वचेवर आलेले डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी सीरम चेहऱ्यावर लावले जाते. सीरम त्वचेला आतून पोषण देते, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स कमी होतात. नियमित चेहऱ्यावर सिरम लावल्यास त्वचा दीर्घकाळ तरुण, मऊमुलायम आणि हेल्दी राहण्यास मदत होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी फेस सीरमचा वापर करावा. पण नेहमीच बाजारात उपलब्ध असलेले महागडे फेस सीरम लावण्यापेक्षा घरगुती आणि औषधी गुणधर्मानी समृद्ध असलेले सीरम लावावे.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फेस सीरमचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून घरीच सीरम तयार करावे. तुरटी, ज्येष्ठमध, ग्लिसरीन, खोबरेल तेल इत्यादी घटक त्वचेला पोषण देतात. तुरटीचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होते आणि त्वचा उजळदार दिसते. मध त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे त्वचा कायमच हायड्रेट आणि निरोगी राहते. रात्री झोपताना फेस सीरम लावल्यास त्वचा हायड्रेट राहते, त्वचेवर काळे डाग कमी होतात, पोर्स टाईट होतात आणि त्वचेचा रंग उजळू लागतो. चला तर जाणून घेऊया घरगुती फेस सीरम बनवण्याची सोपी कृती.
पाठीवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, पाठ होईल स्वच्छ
फेस सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, काचेच्या छोट्या बरणीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात खोबरेल तेल मिक्स करा. दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात ग्लिसरीन टाकून चमच्याने मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात जेष्ठमधाचा तुकडा टाकून ठेवा. तयार केलेले मिश्रण३ किंवा ४ दिवस सूर्यप्रकाशात ठेवून द्या. त्यानंतर संध्याकाळी तयार केलेले मिश्रण घरातील नॉर्मल वातावरणात ठेवा. ३ दिवस तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही फेस सीरम चेहऱ्यावर लावू शकता. हे फेस सीरम नियमित रात्री झोपताना चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार होईल. त्वचेवर आलेले पिंपल्सचे काळे डाग, पिगमेंटेशन दूर करण्यासाठी मदत होते.