१५ मिनिटांमध्ये गायब होईल चेहऱ्यावरील डेड स्किन! मसूर डाळीमध्ये मिक्स करा 'हा' पदार्थ
जेवणातील पदार्थ बनवताना मसूर डाळीचा वापर केला जातो. मसूर डाळीचे वरण चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. कारण मसूर डाळ सहज पचन होते. दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या आणि फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा कितीही उपाय किंवा झोप पूर्ण करून सुद्धा चेहऱ्यावर ग्लो येत नाही. त्वचा कायमच निस्तेज आणि टॅन झाल्यासारखी वाटते. धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर दिसून आल्यानंतर पिंपल्स, मुरूम किंवा मोठे फोड येतात. चेहऱ्यावर आलेले मुरूम आणि पिंपल्स घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र तरीसुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार उन्हात जाणे, तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन, झोपेची कमतरता, चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळे डाग घालवण्यासाठी स्किन केअर क्रीम्स, सीरम्स आणि पॅक इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. पण तरीसुद्धा कोणताच फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी मसूर डाळीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मसूर डाळीचा फेसपॅक आठवडाभर नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम मसूर डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात चमचाभर तांदळाचे पीठ, मध आणि हळद घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चमचाभर दही घालून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. नियमित मसूर डाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास आठवडाभरात चेहऱ्यावर ग्लो येऊन त्वचा स्वच्छ आणि डागविरहित दिसेल. फेसपॅक लावून झाल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावावे. गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा हायड्रेट राहते.
मसूर डाळ त्वचा आतून स्वच्छ करते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मसूर डाळीचा फेसपॅक लावावा. यामध्ये नैसर्गिक विटामिन सी असते. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी दोनदा किंवा तीनदा मसूर डाळीचा फेसपॅक लावावा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी कमी होतात आणि मुरूम किंवा पिंपल्स येत नाहीत. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी गुलाब पाणी आणि दह्याचा वापर करावा.