चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा खूप निस्तेज दिसते? चमचाभर हळदीचा 'या' पद्धतीने करा वापर
सणावाराच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं आपली त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे त्वचेसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. सतत धूळ, माती, प्रदूषणाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा अतिशय निस्तेज दिसते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट, पार्लरमधील फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जाते. पण यामुळे काही काळापुरती त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर वाटते. पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. टॅनिंगमुळे त्वचेचा रंग बदलण्यासोबतच मान, हातांचे कोपरे इत्यादी अवयवांवर काळेपणा वाढू लागतो. बऱ्याचदा घाईगडबडीमुळे त्वचेकडे लक्ष देण्यास जास्तीचा वेळ मिळत नाही.(फोटो सौजन्य – istock)
टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर
वर्षाच्या बाराही महिने त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. चेहऱ्याला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. सुंदर त्वचेसाठी स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासोबतच घरगुती उपाय करून सुद्धा त्वचा सुंदर होते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी चमचाभर हळदीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा फेसपॅक त्वचा अतिशय उजळदार आणि सुंदर करतो.
फेसपॅक बनवण्यासाठी हळद, लिंबाचा रस आणि मध, कॉफीचा वापर करावा. वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात मध, भाजलेली हळद, लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले घट्टसर मिश्रण मान आणि चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून घ्या. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. हा फेसपॅक नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा अतिशय सुंदर दिसेल. मान आणि हातांचे कोपरे स्वच्छ करण्यासाठी फेसपॅकचा वापर करावा.
वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामुळे फेसपॅक तयार करताना हळद भाजून घ्यावी. मध त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी इतर कोणत्याही महागड्या स्किन केअरचा वापर कारण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी.