
अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद
ॲसिडिटी वाढण्याची कारणे?
ॲसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?
शरीरातील उष्णता कशामुळे वाढते?
दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ॲसिडिटी वाढण्याची असत शक्यता असते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात अनेक बदल दिसू लागतात, पण योग्य वेळी शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष दिले जात नाही. ॲसिडिटी हा केवळ पचनाचा आणि पोटाचा आजार नसून अन्ननलिका आणि फुफ्फुसांचे गंभीर नुकसान करणारा आजार आहे. ॲसिडिटीचे प्रमाण वाढल्यानंतर अन्ननलिकेमध्ये खूप जास्त जळजळ वाढते तर काहीवेळा छातीमध्ये वेदना होतात. ॲसिडिटी झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास अल्सर किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात.(फोटो सौजन्य – istock)
फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे
ॲसिडिटीला वैद्यकीय भाषेत ॲसिड रिफ्लक्स असे म्हणतात. या स्थितीत जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिड खाल्लेल्या अन्नपदार्थांचे पचन करण्याऐवजी उलट दिशेने अन्ननलिकेत येऊ लागते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. भारतामध्ये ३०% ते ४०% लोक दर आठवड्याला ॲसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहेत. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. शरीरात वाढलेली ॲसिडिटी केवळ पोटापुरती मर्यादित नसून घसा, दात आणि फुफ्फुसांना हानी पोहचवते. भारतीय जेवणातील मसाले आणि कोणत्याही तेलाचा केलेला वापर शरीरासाठी घातक ठरतो. चला तर जाणून घेऊया अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
छातीत किंवा पोटाच्या वरच्या भागात जळजळ होणे
आंबट ढेकर येणे
तोंडात कडवट पाणी येणे
घसा बसणे
कोरडा खोकला
शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करण्याऐवजी सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी केळी, कलिंगड, काकडी आणि नारळ पाणी इत्यादी पदार्थ खावेत. या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. थंड पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ॲसिड शांत होते. ओवा, बडीशेप, आले, ताक आणि हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर नियमित वज्रासन करावे. वज्रासन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच जेवण आणि झोप यात ३ तासांचे अंतर असावे.
Ans: छाती आणि घशात जळजळ होणे, तोंडात आंबट किंवा कडू पाणी येणे.
Ans: मसालेदार, तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ
Ans: कमी अंतराने थोडे-थोडे जेवण घ्या, रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २-३ तास आधी करा