Deep Kissing चे परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
प्रेम आणि प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ‘Kissing’. चित्रपटांमध्ये ते जितके सुंदर आणि रोमांचक दिसते तितकेच प्रत्यक्षात ते कधीकधी तितकेच त्रासदायक ठरू शकते. विशेषतः जर Deep Kissing जास्त काळ केले गेले किंवा जोडीदाराची तोंडाची स्वच्छता चांगली नसेल तर ते तुमच्या ओठांना हानी पोहोचवू शकते.
यामुळेच अनेक मुलींना हनिमूनच्या काळात ओठांना सूज येणे किंवा जळजळ होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि नंतर इंटरनेटवर शांतपणे उपाय शोधू लागतात. हल्ली गुगलवर Deep Kissing नंतर होणाऱ्या त्रासावर घरगुती उपाय शोधणे वाढले असल्याचे दिसून येत आहे. पण Deep Kissing मुळे नक्की काय नुकसान होते ते आपण जाणून घेऊया
ओठांची त्वचा शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत खूप पातळ असते आणि त्यांना घामाच्या ग्रंथी नसतात. यामुळे, ते लवकर कोरडे होतात आणि कोणताही बाह्य दाब किंवा लांब चुंबन त्यांना नुकसान पोहोचवू शकते. यामुळेच खोलवर चुंबन घेतल्याने ओठ फाटणे, जळजळ होणे आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Kiss करताच आपोआप डोळे का बंद होतात? फार खास आहे यामागील कारण
दीर्घकाळ चुंबन घेतल्याने ओठांचा ओलावा कमी होतो आणि ते कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. त्यामुळे तुम्ही डीप किसिंग करणार असाल तर त्याचे तोटे आधी जाणून घ्या. जेणेकरून तुमच्या जोडीदाराला पुढे कोणत्याही त्रासाला सामोरे जावं लागू नये. चुंबन घेताना आवेग अधिक असतो पण त्या आवेगाला थोडंसं नियंत्रणात आणणंही गरजेचे आहे
ओठांच्या पातळ त्वचेमुळे, जास्त दाब आल्यास किंवा दीर्घ चुंबन घेतल्याने ओठ फुटू शकतात. यामुळे ओठांना भेग पडून जळजळ होते आणि त्याचा ओठांनाही त्रास होतो. शिवाय खायलादेखील त्रास होतो.
धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू खाणाऱ्या जोडीदारासोबत चुंबन घेतल्याने ओठांमध्ये जळजळ आणि खाज येऊ शकते. याशिवाय या गोष्टींमुळे ओठांना सूज आणि लालसरपणा देखील येऊ शकतो. कधीकधी Deep Kissing घेतल्यानंतर, ओठांवर सौम्य किंवा तीव्र सूज येऊ शकते.
तुम्ही अगदी सहज किस घेत असाल, हळूवारपणे घेत असाल तर यामुळे मूड सुधारतो. पण तुम्ही Deep Kissing ओठांच्या नसा थकवते आणि मूडवर विपरीत परिणाम करू शकते. याशिवाय श्वास घेण्यात अडचण येते. २ मिनिटांपेक्षा जास्त काळ सतत चुंबन घेतल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, विशेषतः दमा असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
जोडीदाराची तोंडाची स्वच्छता चांगली नसल्यास, नागीण आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. संसर्गाचा धोका झाल्यामुळे तोंडाचे अनेक आजारही होऊ शकतात. त्यामुळे दीर्घकाळ चुंबन करताना थोडा विचार करावा. प्रेम आणि किस या दोन्ही गोष्टी शारीरिक संबंधात महत्त्वाच्या आहेत, पण ते करताना तुम्ही काळजीदेखील घ्यायला हवी.