
दीपिका पदुकोण 'अशा; पद्धतीने घेते त्वचेची काळजी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. मस्तानी गर्ल अशी ओळख तिने सगळीकडे निर्माण केली आहे. तिच्या अभिनयासोबतच तिचा फिटनेस, स्किन, हेअर सगळ्यांचं आवडतात. आत्तापर्यंत दीपिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सगळेच चित्रपट सुपरहिट झाले आहेत. काही दिवसांआधी ती लवकर आई होणार आहे अशी घोषणा केली होती. दीपिका गरोदर असून लवकरची ती सगळ्यांना गुडन्यूज देणार आहेत. सोशल मीडियावर दीपिका नेहमी सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काहींना काही शेअर करत असते.
गरोदरपणात दीपिकाच्या चेहऱ्यावरील ग्लो पासून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना दीपिका नेमकं तिच्या त्वचेसाठी कोणते स्किन केअर फॉलो करते? काही दिवसांआधी दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर गरोदरपणात कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करते याबद्दल सांगितले आहे. तिने स्किन केअर रुटीनमधील ब्युटी प्रॉडकटची नावे देखील सांगितली आहेत. चला तर जाणून घेऊया.
दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे, मी नियमित आणि सातत्याने स्किन केअर रुटीन फॉलो करते. यामध्ये 3 सोप्या पद्धती फॉलो करून त्वचेची उत्तम प्रकारे काळजी घेते. यामध्ये क्लीन्झ, हायड्रेट आणि प्रोटेक्ट असे आहे. तसेच आठवड्यातून फूल बॉडी मसाज, फेसपॅक आणि हेअरमास्क वापरते, असे दीपिकाने सांगितले आहे.
हे देखील वाचा: रात्री चुकूनही नका करू ‘या’ गोष्टींचे सेवन, नाहीतर चेहऱ्यावर येऊ शकतात लाल रॅशेस