लग्नात केस सुंदर दिसण्यासाठी दीपिका पदुकोणने वापरला होता 'हा' घरगुती पदार्थांपासून बनवलेला स्प्रे
लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा. या सोहळ्यात प्रत्येकालच खूप सुंदर आणि आकर्षक दिसायचं असतं. लग्नाच्या दोन ते महिने आधीपासून खरेदी. लग्नाची तयारी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. याशिवाय मुली सुंदर दिसण्यासाठी स्किन केअर, हेअर केअर रुटीन फॉलो करतात, ज्यामुळे लग्नात केसांची चमक अतिशय सुंदर दिसेल. त्यातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सुंदर दिसण्यासाठी छानसा मेकअप, कपड्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित केले जाते. लग्नात नैसर्गिकरित्या त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात.(फोटो सौजन्य – pinterest)
लग्न ठरल्यानंतर मुली सुंदर दिसण्यासाठी हायड्रा फेशिअल, केमिकल पिल्स इत्यादी अनेक महागड्या ट्रीटमेंट करतात. ज्यामुळे त्वचेवर सुंदर ग्लो येतो.याशिवाय केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र याचा परिणाम केसांवर दिसून येत नाही. काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची काळजी घेण्यासाठी दीपिका पादुकोणने कोणत्या हेअर स्प्रेचा वापर केला, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या हेअर स्प्रेच्या वापरामुळे लग्नात तिचे केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसत होते.
दीपिकाने लग्नात केस सुंदर दिसण्यासाठी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्याकडून घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला हेअर स्प्रे तयार करून घेतला होता. या स्प्रेच्या नियमित वापरामुळे केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. केसांना नैसर्गिक चमक, मजबूतपणा, आणि पोषण मिळते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हेअर स्प्रे तयार करू शकता. केसांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर करावा. चला तर जाणून घेऊया हेअर स्प्रे तयार करण्याची सोपी कृती.
रोझमेरीमुळे केस गळणे थांबते. केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि घनदाट केसांसाठी रोझमेरीचा वापर करावा. मेथीचे दाणे केसांना पोषण देतात. स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी रोझमेरीचा वापर करावा. मेथीचे दाणे केसांसाठी नैसर्गिक कंडिश्नरप्रमाणे काम करतात. काळीमीरीचे दाणे केसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत.