
धुरंधरची शूटिंग झालिये या लोकेशनवर... दरवर्षी अनेक भारतीय जातात इथे फिरायला, राहणं-खाणं; सर्वच माहिती जाणून घ्या
जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
चित्रपटात बँकॉकमधील काही दृश्ये अत्यंत सुंदर पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटानंतर बँकॉकला भेट देण्याची उत्सुकता अनेकांमध्ये वाढली आहे. खरं तर बँकॉक हे भारतीय पर्यटकांचं आवडतं परदेशी पर्यटनस्थळ आहे. कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोजक्या ठिकाणांपैकी बँकॉक एक आहे.
बँकॉक का आहे परफेक्ट वेकेशन डेस्टिनेशन?
बँकॉकची ओळख त्याच्या रंगीबेरंगी नाईट मार्केट्स, सुंदर बीच डेस्टिनेशन्स आणि खवय्यांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रीट फूडसाठी आहे. फिरायला, खायला आणि शॉपिंगसाठी इथे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कुटुंब, मित्र किंवा पार्टनरसह ट्रिप प्लॅन करण्यासाठी बँकॉक एक उत्तम पर्याय मानला जातो. ‘धुंरधर’मध्ये बँकॉकचं ग्लॅमर दिसल्यानंतर, हे शहर पुन्हा एकदा ट्रॅव्हलर्ससाठी मोठं आकर्षण ठरत आहे.
भारतीयांसाठी बजेट-फ्रेंडली परदेशी ट्रिप
बँकॉक हे पर्यटनासाठी अतिशय सोयीस्कर शहर आहे. इथे कमी किमतीत बजेट हॉटेल्सपासून ते आलिशान रिसॉर्ट्सपर्यंत सर्व प्रकारचे स्टे ऑप्शन्स सहज मिळतात. शिवाय, इथलं स्ट्रीट फूड चवदार आणि परवडणारं असल्यामुळे पर्यटकांचा खर्च फारसा वाढत नाही. त्यामुळे कमी बजेटमध्ये जास्त एन्जॉय करण्यासाठी बँकॉक योग्य ठिकाण मानलं जातं.
बँकॉक ट्रिपसाठी अंदाजे बजेट किती?
जर तुम्ही बँकॉकसाठी पॅकेज बुक केलं, तर ते तुलनेने सोयीस्कर आणि किफायतशीर ठरू शकतं. विविध ट्रॅव्हल वेबसाइट्सवर वेगवेगळे पॅकेज उपलब्ध असतात. साधारणपणे एका व्यक्तीसाठी बँकॉकचा खर्च सुमारे ९० ते ९५ हजार रुपयांच्या आसपास येतो. या बजेटमध्ये ६ रात्री आणि ७ दिवसांचा टूर असतो. यात काही दिवस क्राबी, एक दिवस फी-फी आयलंड आणि उरलेले दिवस फुकेतसारख्या ठिकाणी स्टे दिला जातो.
पॅकेजमध्ये काय-काय सुविधा मिळतात?
या पॅकेजमध्ये विमानाचं ये-जा तिकीट, ४ स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, काही जेवणाची सोय आणि विविध अॅक्टिव्हिटीज समाविष्ट असतात. त्याशिवाय आयलंड टूरसारखे अनुभवही दिले जातात. त्यामुळे जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत गेल्यास कमी बजेटमध्येही भरपूर ठिकाणं एक्सप्लोर करता येतात.
पॅकेजशिवाय गेलात तरी खर्च नियंत्रणात
जर तुम्हाला स्वतः ट्रिप प्लॅन करायची असेल, तर पॅकेज न घेताही बँकॉकला जाणं फार महाग पडत नाही. फ्लाइट तिकिटांच्या बाबतीत, भारतातून बँकॉकसाठी थेट फ्लाइट्स तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध असतात. योग्य वेळी बुकिंग केल्यास तिकिटांचा खर्च आणखी कमी होऊ शकतो.
बँकॉकमधील स्टे आणि फूड
बँकॉकमध्ये राहण्याचा खर्च पूर्णपणे तुमच्या बजेटवर अवलंबून असतो. साधारण २ ते ३ हजार रुपयांमध्ये प्रतिरात चांगले बजेट हॉटेल्स सहज मिळतात. त्यामुळे कमी खर्चातही आरामदायी मुक्काम शक्य आहे. खाण्याबाबत बोलायचं झालं, तर बँकॉकचं स्ट्रीट फूड जगप्रसिद्ध आहे. सी-फूड, गोड पदार्थ, ताज्या फळांपासून बनवलेले स्नॅक्स इथे स्वस्तात मिळतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पर्याय भरपूर आहेत. मात्र, शाकाहारी पर्यटकांना काहीशी शोधाशोध करावी लागू शकते. ‘धुंरधर’मधील बँकॉकची झलक पाहिल्यानंतर जर तुम्हालाही परदेशात फिरायचं स्वप्न पडत असेल, तर बँकॉक हा उत्तम आणि बजेट-फ्रेंडली पर्याय ठरू शकतो. कमी खर्चात सुंदर ठिकाणं, चवदार खाणं आणि वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी बँकॉक ट्रिप नक्कीच लक्षात ठेवण्यासारखी आहे.