
अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा 'हा' खास लेप, सुरकुत्या होईल कमी
Dark Circles: कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता, तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर, जागरण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढून त्वचा पूर्णपणे सुकल्यासारखी आणि निस्तेज झाल्यासारखी वाटू लागते. चेहरा निस्तेज, थकलेला आणि वयस्कर दिसू लागल्यानंतर तो पुन्हा एकदा फ्रेश आणि हायड्रेड ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम, सीरम आणि इतर स्किन केअरचा वापर केला जातो. पण अनेक वेगवेगळे उपाय करून सुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. काहीवेळा स्किन केअरच्या वापरामुळे त्वचा आणखीनच निस्तेज दिसू लागते.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पारंपरिक पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. रासायनिक उपचारांऐवजी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय केल्यास आठवडाभरात त्वचेमध्ये बदल दिसून येतील. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी हा आयुर्वेदिक लेप खूप जास्त प्रभावी ठरेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
प्राचीन काळापासून स्किन केअर रुटीनमध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यातील अतिशय प्रभावी पदार्थ म्हणजे जायफळ आणि मुलेठी. या दोन्ही पदार्थांमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेला आवश्यक पोषण देतात आणि त्वचेवर आलेली सूज कमी करण्यास मदत करतात. डोळ्यांखाली त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे योग्य त्या पदार्थांचा वापर केल्यास त्वचेवरील चमक वाढण्यासोबतच त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
आयुर्वेदिक लेप तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये जायफळ आणि मुलेठीची पावडर घेऊन मिक्स करा. त्यानंतर त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्वचा पुसून त्यावर हलके मॉइश्चरायझर किंवा ऑलिव्ह ऑइल लावून ठेवा. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि डोळे अतिशय सुंदर दिसतील.
Diwali Eye Makeup Tips: सणासुदीत Smoky eyes आणि काजळ लावण्याचा विचार करताय? मग आधी वाचा या 5 टिप्स!
हा लेप आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डोळ्यांभोवती लावल्यास डोळ्यांवर वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होईल आणि डोळे उठावदार दिसतील. पण लेप लावण्यानंतर लगेच जळजळ किंवा डोळ्यांमध्ये लालसरपणा वाढत असेल तर लेप लावू नये. कोणताही लेप किंवा फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करणे फार आवश्यक आहे. याशिवाय काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपायांसोबतच नियमित भरपूर पाणी, ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. आहारात लोह आणि विटामिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होईल.
Ans: पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यांखालील त्वचा निस्तेज दिसू शकते. थकव्यामुळे रक्तवाहिन्या अधिक उठून दिसल्याने काळी वर्तुळे जाणवू शकतात. मात्र, काळ्या वर्तुळांची इतरही अनेक कारणे असू शकतात.
Ans: डोळ्यांखालील त्वचेसाठी सुगंधविरहित आणि सौम्य मॉइश्चरायझर वापरू शकता. कोणताही घरगुती लेप वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
Ans: वाढते वय, त्वचेतील कोलेजनचे प्रमाण कमी होणे, सूर्यप्रकाश, अपुरी झोप, डिहायड्रेशन आणि त्वचेची योग्य काळजी न घेणे यांमुळे डोळ्यांभोवती सुरकुत्या वाढू शकतात.