
वजन कमी करण्यासाठी काय करावे, डाएटिशियनचा मोलाचा सल्ला
नवीन वर्षात तुम्हाला तुमचा लुक बदलायचा असेल आणि वजन कमी करून अगदी स्टायलिश आणि फॅशनेबल दिसायचे असेल तर तसंच आपलं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर तुम्ही हा लेख वाचलाच पाहिजे. अलीकडेच वजन कमी करणारे तज्ज्ञ आणि आहार प्रशिक्षक तुलसी नितीन यांनी त्यांच्या व्हायरल इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये 30 दिवसांचा वजन कमी करण्याचा प्लॅन शेअर केला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की या फॉर्म्युलामुळे एका महिन्यात 10 ते 15 किलो वजन कमी करण्यात मदत होईल.
तुम्हीही नव्या वर्षात स्वतःला नवं पाहू इच्छित असाल आणि तुम्हाला तुमचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर डाएटिशियनचे हे सिक्रेट तुम्ही नक्की वाचा आणि फॉलो करा. याविषयी बोलताना प्राची चंद्रा, बंगळुरू स्थित साक्रा वर्ल्ड हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट यांनी सांगितले की, नवीन वर्ष जसजसे जवळ येत आहे तसतसे सोशल मीडिया झटपट वजन कमी करण्याच्या टिप्सने अगदी भरलेला दिसून येतो. तथापि, आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या या प्रवासासाठी समर्पण, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत. कोणत्या पद्धतीने ते बदल व्हावेत जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
कसा असावा डाएट प्लॅन
डाएट प्लॅन कसा करावा
प्राची चंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, “ही ३० दिवसांची आहार योजना कॅलरी आणि उच्च प्रथिने मर्यादित करण्यावर आधारित आहे, परंतु या प्रकारचा आहार योजना दीर्घकाळ पाळणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते, परंतु स्नायूंचे नुकसानदेखील होऊ शकते
हेदेखील वाचा – वजन कमी करण्यासाठी टॉप 5 पेय; वेट लॉससाठी उत्तम पर्याय
वजन कमी करण्याच्या खास टिप्स
वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत
याशिवाय प्राची चंद्रा यांच्या सांगण्याप्रमाणे स्प्रिंटिंग, सायकलिंग आणि बॉडी एक्सरसाइज ज्यामध्ये बर्पीज, स्क्वॅट्स, लंजेस यासारखे उच्च तीव्रता इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) शरीरात जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमची चरबी कमी होते 2024 पूर्वी तंदुरुस्तीची उद्दिष्टे पूर्ण करा, मग तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत 30 दिवसांचा हा फॉर्म्युला समाविष्ट करू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की ते केवळ तज्ञांच्या सल्ल्याचे पालन करून मगच तुम्ही डाएट अथवा व्यायाम करावा.
हेदेखील वाचा – व्यायाम डाईट करून वजन कमी होत नाही? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.