वजन कमी करताना 'या' चुका करणे टाळा
वजन वाढल्यानंतर अनेक लोक महागडे डाईट, जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याचा फारसा प्रभाव शरीरावर दिसून येत नाही. सध्या वाढलेलं वजन हा एक चर्चेचा विषय झाला असून अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर पोटावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. ऑफिसमध्ये काम करत तासनतास एकाच जागेवर बसून राहिल्यानंतर हळूहळू वजन वाढू लागते. तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरून आणलेले पदार्थ खाणे, कमी झोप इत्यादींचा परिणाम लगेच शरीरावर दिसतो. चुकीच्या पद्धतीचा डाईट केल्यामुळे सुद्धा वजन आणखीन वाढण्यास सुरुवात होते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फॉलो करत असलेला डाईट करताना कोणत्या गोष्टी करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.डाईटच्या आधारावर लवकर वजन कमी होत नाही. त्यामुळे व्यायाम करणे आवश्यक आहे. अनेकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो किंवा व्यायाम करण्याची इच्छा होत नाही. पण वजन कमी करण्यासाठी नियमित 45 मिनिटं व्यायाम करणे बंधनकारक आहे. सायकल चालवणे, धावणे, पोहणे किंवा योगासने केल्यास शरीरावर लवकर प्रभाव दिसून येईल.
हे देखील वाचा: सकाळी उठल्यावर अंग आणि पाठदुखी होते का? मग नियमित करा स्ट्रेचिंग
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी संध्याकाळचे जेवण पूर्णपणे बंद करून टाकतात. पण असे केल्यामुळे शरीर आणखीन कमकुवत होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बंद करण्याऐवजी जेवणात कमी कॅलरी युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. गोड आणि चवीला आंबट असलेले पदार्थ खाणे टाळावे.
दैनंदिन जीवनात निरोगी शरीरासाठी आणि त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाणी, डिटॉक्स वॉटर, ज्यूस यांच्यावर जास्त भर द्यावा.वजन कमी करण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्यावे. अनेकदा साधं पाणी पिण्याचा कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही उकळलेलं किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.
हे देखील वाचा: रोज डोकं दुखण्याची ही असू शकतात कारणं
वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी कमीत कमी ७ तास झोपणे आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीर आणि मन प्रसन्न राहत. मानसिक आरोग्य चांगले राहिले तर शारीरिक आरोग्यसुद्धा चांगले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पूर्ण झोप घ्या.