Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलेरिया की डेंग्यूः ताप कशामुळे आला हे कसे ओळखावे?

Malaria Vs Dengue: मलेरिया आणि डेंग्यू हे दोन्ही आजार वेगवेगळे असले तरीही याची लक्षणे बऱ्यापैकी समान आहेत. त्यामुळे बरेचदा नक्की कोणता ताप येत आहे हे पटकन ओळखता येत नाही. या दोन्हीची लक्षणे आणि निदान जर आपण लक्षात घेतली तर त्यातील तफावत समजण्यास मदत मिळेल. जाणून घ्या तज्ज्ञांकडून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 24, 2024 | 02:43 PM
मलेरिया विरूद्ध डेंग्यू

मलेरिया विरूद्ध डेंग्यू

Follow Us
Close
Follow Us:

ताप हे मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही रोगांचे सामान्य लक्षण आहे, हे दोनही रोग उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात डासांमुळे होतात. तथापि,  प्रभावी उपचार आणि व्यवस्थापनासाठी त्यांच्यातील फरक लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे. लक्षणे, संक्रमण आणि निदान पद्धतीं मधील फरक समजून घेतल्यास तापाचे कारण समजण्यात मदत मिळू शकते. 

डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा  यांनी याबाबत अधिक माहिती देत योग्य सल्लाही दिला आहे. तुम्हालाही यातील फरक कळत नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचावा (फोटो सौजन्य – iStock) 

मलेरिया कसा होतो?

ताप कसा येतो

प्लाझ्मोडियम परजीवींमुळे होणारा मलेरिया अ‍ॅनोफिलीस डासाची संक्रमित मादी चावल्यास पसरतो. प्लाझ्मोडियमच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यामध्ये प्लाझ्मोडियम फाल्सीपॅरम सर्वात गंभीर आहे. याबाबत वेगवेगळे अभ्यासही करण्यात आले आहेत. 

हेदेखील वाचा – डेंग्यूमुळे पांढऱ्या पेशी कमी झाल्या असतील, तर ‘या’ पदार्थांच्या मदतीने वाढवा पेशींची संख्या

डेंग्यू ताप कसा होतो?

डेंग्यू ताप हा डेंग्यू विषाणूमुळे होतो, ज्यामध्ये चार सेरोटाइप (डीइएनव्ही -1, डीइएनव्ही -2, डीइएनव्ही -3 आणि डीइएनव्ही -4) असतात. याचे संक्रमण हे प्रामुख्याने एडीस एजिप्सी आणि एडीस अल्बोपिक्टस या एडीस डासांद्वारे होते. दोन्ही रोगांमध्ये ताप येतो, परंतु त्याची वेगळी लक्षणे त्यांच्यातील फरक ओळखण्यास मदत करू शकतात.

मलेरियाची माहिती 

  • मलेरिया मध्ये सहसा ताप कमी जास्त होत राहतो (दर 48 -72 तासांनी) थंडी आणि घाम येणे ही लक्षणे दिसतात
  • अतिरिक्त लक्षणे: डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा, मळमळ, उलट्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये कावीळ, फेफरे आणि भ्रम अशी लक्षणे दिसून येतात.
  • आरंभः डास चावल्यानंतर, प्लाझ्मोडियमच्या प्रजातीनुसार 7 -30 दिवसांनी लक्षणे दिसून येतात.

डेंग्यूची माहिती 

  • डेंग्यूमुळे सामान्यतः अचानकपणे  खूप जास्त ताप येतो (ज्याला “ब्रेकबोन ताप” म्हणतात) जो 2 -7 दिवस टिकतो
  • अतिरिक्त लक्षणे: तीव्र डोकेदुखी, रेट्रो-ऑर्बिटल वेदना (डोळ्यांच्या मागील भागात वेदना), तीव्र स्नायू आणि सांधेदुखी, पुरळ, सौम्य रक्तस्त्राव (नाक किंवा हिरड्या मधून रक्तस्त्राव), आणि पांढऱ्या रक्त पेशींची संख्या कमी होणे
  • आरंभ: संक्रमित डास चावल्यानंतर 4 -10 दिवसांनी लक्षणे दिसून येतात.

मलेरियासाठी निदान 

योग्य उपचारासाठी योग्य निदान आवश्यक आहे.

  • मायक्रोस्कोपीः ब्लड स्मियर मायक्रोस्कोपी ही एक सामान्य निदान पद्धत आहे,  रक्तामध्ये प्लाझ्मोडियम परजीवी आढळतात
  • रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (आरडीटी):या चाचण्या प्लाझ्मोडियम परजीवींमधून आलेले अँटीजेन्स शोधून लगेच निष्कर्ष देतात .

डेंग्यूसाठी निदान

  • सेरोलॉजी चाचण्या: या चाचण्यांमध्ये डेंग्यू विषाणूच्या प्रतिसादासाठी तयार झालेल्या अँटीबॉडीज (आयजीएम आणि आयजीजी) शोधल्या जातात
  • मॉलीक्युलर टेस्ट्स:  व्हायरल आरएनए शोधण्यासाठी आरटी-पीसीआरचा वापर केला जातो, विशेषतः संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपयुक्त
  • एनएस1 अँटीजेन चाचणीः ही चाचणी डेंग्यू विषाणूतील नॉन-स्ट्रक्चरल प्रोटिन1 (एनएस 1) शोधते आणि संक्रमणाच्या पहिल्या आठवड्यात प्रभावी असते

हेदेखील वाचा – Immune Boosting Herbs: पावसाळ्यात आजारांना दूर ठेवतील 4 वनस्पती, असे करा सेवन

उपचार

दोन्ही आजारांवर काय उपाय करावा

दोन्ही आजारांना वेगवेगळ्या उपचारपद्धतीची गरज असते.

मलेरिया: उपचारांमध्ये सामान्यत: क्लोरोक्वीन, आर्टेमिसिनिन-बेस्ड कॉम्बिनेशन ट्रीटमेन्ट  (एसीटी) किंवा प्लाझमोडियम प्रजातीनुसार मलेरियारोधक औषधे दिली जातात.

डेंग्यूः डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाहीत. यामध्ये काळजीवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामध्ये योग्य हायड्रेशन, एसीटॅमिनोफिन देऊन वेदना कमी करणे (रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याने आयबुप्रोफेन आणि अॅस्पिरिन सारख्या एनएसएआयडी टाळणे), आणि डेंग्यू हेमोरॅजिक फीव्हर (डीएचएफ) किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम (डीएसएस) सारख्या गंभीर अडचणीं वर लक्ष ठेवणे.

प्रतिबंध कसा करावा?

या दोन्ही आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत.

मलेरिया: कीटक प्रतिकारक वापरणे, झोपताना कीटकनाशक लावलेल्या मच्छरदाण्या   वापरणे आणि बाधित भागात प्रवास करताना प्रॉफिलॅटिक मलेरिया प्रतिबंधक औषधे घेतल्यास मलेरियाचा प्रतिबंध करणे शक्य होते.

डेंग्यू: प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कीटक प्रतिकारक वापरणे, संरक्षक कपडे घालणे, साचलेले पाणी काढून टाकणे जेणेकरून डासांचे प्रजनन होण्यास आळा बसेल आणि समुदाय – व्यापी डास नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश आहे.

मलेरिया आणि डेंग्यू दोन्ही तापास कारणीभूत ठरतात आणि डासांद्वारे संक्रमित होतात, परंतु त्यांची लक्षणे, निदान आणि उपचारांमध्ये फरक आहेत. योग्य आणि प्रभावी वैद्यकीय उपचारांसाठी हे फरक ओळखणे महत्वाचे आहे.

Web Title: Difference between malaria and dengue symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
1

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
2

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
3

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
4

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.