Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

गेल्या काही वर्षांपासून जोडप्यांना बाळ होण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो आहे असं दिसून येत आहे. अनेक डॉक्टर त्यांचे अनुभव सांगतात. असाच एक अनुभव सांगण्यात आला असून ७ वर्ष एका महिलेला मूल होत नव्हतं…

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 01, 2026 | 06:51 PM
७ वर्ष मूल न झाल्याने पीआरपी ट्रीटमेंट घेतली आणि पुढे काय घडलं (फोटो सौजन्य - iStock)

७ वर्ष मूल न झाल्याने पीआरपी ट्रीटमेंट घेतली आणि पुढे काय घडलं (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • आई होण्यासाठी संघर्ष
  • ७ वर्षानंतरही होत नव्हते मूल
  • पीआरपी उपाय पद्धती नक्की काय आहे
बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, वेळीअवेळी झोप आणि सतत काम करणं या सगळ्यामुळे केवळ झोपेवरच नाही तर बाळ होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवरही परिणाम होताना दिसतोय. अनेक जोडप्यांना मूल होण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागत आहे आणि असाच प्रकार घडला आहे पुण्यात. नेमकं काय घडलं आणि कोणती ट्रीटमेंट घेण्यात आली आपण जाणून घेऊया 

पुण्यातील एक दाम्पत्य दीपक (४२) आणि अनघा (३६) (नावं बदलली आहेत)  यांनी लग्नानंतर सात वर्षे गर्भधारणेकरिता प्रयत्न केला होता. अनघाला पूर्वी झालेल्या क्षयरोगामुळे तिच्या फलोपियन ट्यूब्स आणि गर्भाशयाच्या आतील भिंतीचे (एंडोमेट्रियम) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी मूल दत्तक घेण्याचा पर्याय विचारात घ्यावा, असा सल्ला देखील दिला. लॅप्रोस्कोपीमध्ये द्रवपदार्थाने भरलेली फॅलोपियन ट्यूब, गर्भाशयाला जखम (अ‍ॅशरमन सिंड्रोम) आणि गर्भाशयाची भिंत पातळ असल्याचे आढळून आले, ज्यामुळे पुढील उपचार आव्हानात्मक होते. 

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

तज्ज्ञांनी दिला सल्ला 

पुण्यातील लुल्लानगरमधील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या प्रजनन तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची भिंत (एंडोमेट्रियम) पुन्हा तयार होण्यासाठी आणि ती अधिक सक्षम व्हावी म्हणून पीआरपी (प्लेटलेट-रिच प्लाझ्मा) थेरेपीद्वार् उपचार दिला. रुग्णाच्या गर्भाशयाच्या भिंतीची (एंडोमेट्रियम) वाढीची जवळजवळ एक वर्ष निरीक्षण केल्यानंतर योग्य वेळी आयव्हीएफ प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या दाम्पत्याला यशस्वी गर्भधारणा झाली आणि अलीकडेच त्यांनी निरोगी बाळाला जन्म दिला.

संपूर्ण उपचारानंतरही गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही 

रुग्णाला २०१९ मध्ये क्षयरोग (TB) झाला होता आणि तिने संपूर्ण उपचार घेतले होते. मात्र त्या संसर्गामुळे तिच्या प्रजनन अवयवाला कायमस्वरूपीचे नुकसान झाले. तिची मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमीकमी होऊ लागला आणि हे तिच्या गर्भाशयाची भिंत (एंडोमेट्रियम) नीट वाढत नसल्याचे लक्षण होते. पण त्या वेळी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.

२०२३ मध्ये जेव्हा हे दाम्पत्य नोव्हा आयव्ही फर्टिलिटीमध्ये उपचाराकरिता आले तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या. पत्नीच्या गर्भाशयाची भिंत (एंडोमेट्रियम) फक्त ५.५ मिमी होती, जी किमान ७ मिमी इतकी आवश्यक होती. पतीच्या वीर्याच्या तपासण्यांमध्येही थोडी गुणवत्ता कमी झाल्याचे आढळून आले.पत्नीकडे स्त्रीबीज चांगल्या प्रमाणात उपलब्ध होती आणि बाळ हवे असेल तर हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असल्याची त्यांना जाणीव होती.आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान तिचे स्त्रीबीज यशस्वीरित्या काढण्यात आली आणि पतीच्या वीर्यासोबत मिसळून (fertilize) निरोगी भ्रूण तयार झाले.

१ वर्ष पूर्ण प्रयत्न 

पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या डॉ. रूपाली तांबे यांच्या नेतृत्वाखालील टीमने तिची एंडोमेट्रियल जाडी( गर्भायाच्या भिंतीची जाडी) सुधारण्यासाठी जवळजवळ एक वर्ष प्रयत्न केले.पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या वंधत्व निवारण तज्ज्ञ  डॉ. रूपाली तांबे सांगतात की, फक्त क्षयरोगच नाही, तर क्लॅमिडीया आणि गोनोरियासारखे लैंगिक आजारदेखील उपचारानंतरही प्रजनन आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात, बहुतेकदा सुरुवातीला त्याची फारशी लक्षणंही आढळून येत नाहीत.

अनघाने हिस्टेरोस्कोपीसह मेट्रोप्लास्टी हा उपचार घेतला म्हणजे गर्भाशयातील दोष दुरुस्त करून तो गर्भधारणेयोग्य बनवण्याची प्रक्रिया. यासोबतच तिला पीआरपी (Platelet-Rich Plasma) थेरपी देण्यात आली. हा उपचार एंडोमेट्रियमची (गर्भाशयाची आतील भिंत) जाडी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी वैज्ञानिकरीत्या प्रभावी मानला जातो.

Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक संबंधांनंतर अर्धा तास तसंच झोपणं गरजेचे आहे का? काय आहे तथ्य

पीआरपीचा वापर कसा होतो 

पीआरपीचा वापर साधारणतः तीन परिस्थितींमध्ये केला जातो त्या म्हणजे गर्भाशयाची भिंत खूप पातळ असते तेव्हा, आयव्हीएफ वारंवार अपयशी ठरल्यानंतर, काही महिलांमध्ये स्त्रीबीज कमी प्रमाणात तयार होत असतील (low ovarian reserve) अशावेळी तसेच रुग्णाचा एंडोमेट्रियम पातळ असताना, वारंवार आयव्हीएफ अयशस्वी झाल्यास आणि काही प्रकरणांमध्ये महिलांमध्ये स्त्रीबीज कमी प्रमाणात असतात तेव्हा आयव्हीएफमध्ये पीआरपी उपचार वापरले जातात.

डॉ. रूपाली तांबे सांगतात की, बहुतेकदा आयव्हीएफ उपचारांमध्ये गर्भाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते, परंतु अशा प्रकरणांमध्ये जेव्हा आपल्याला समजते की गर्भधारणा साध्य करण्यासाठी गर्भाशय, एंडोमेट्रियमची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. या प्रकरणात व्यापक उपचारानंतर, एंडोमेट्रियमची जाडी 6.7 मिमी पर्यंत पोहोचली. योग्य वेळी योग्य उपचार आणि मार्गदर्शनासह, बहुतेक रुग्ण पालकत्वाचा अनुभव घेऊ शकतात. उपचारादरम्यान एकच एम्ब्रियो ट्रान्स्फर करण्यात आले आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी गर्भधारणा झाली,  परिणामी निरोगी बाळाला आज जन्म दिला आहे जे आता २ महिन्याचे झाले आहे.

आम्हाला बऱ्याच डॅाक्टरांद्वारे सांगण्यात आले होते की तुम्ही मूल दत्तक घेण्याच्या पर्यायाचा विचार करु शकता. मात्र स्वत:चे मूल हवे या अपेक्षेने आम्ही नोव्हा आयव्हीएफ येथे डॉ. रूपाली यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला सल्ला दिला की आम्ही पीआरपी थेरपी आणि मेट्रोप्लास्टीसारखे पर्याय निवडू शकतो ज्याद्वारे एंडोमेट्रियम वाढवता येऊ शकते. हा एकमेव पर्याय असून आम्हाला याकडून खुप अपेक्षा होती. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आणि अवघ्या वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला आमच्या पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करता आले.

जननेंद्रियाचा क्षयरोग आणि गर्भधारणा

जननेंद्रियाचा क्षयरोग हा क्षयरोगाचा एक प्रकार असून तो स्त्रियांच्या प्रजनन अवयवांवर परिणाम करतो. याचे वेळीच निदान न झाल्यास गर्भधारणेची क्षमता कमी होते. जगभरातील वंध्यत्व क्लिनिकमध्ये येणाऱ्या सुमारे ५% महिलांना जननेंद्रियाचा क्षयरोग असतो.बहुतेक रुग्णांचे वय हे २० ते ४० वर्षांच्या दरम्यान असते.भारतात टिबीचे प्रमाण अधिक असून जननेंद्रियाचा क्षयरोगाचे वेळीच निदान न होण्याची शक्यता असते.कारण हा क्षयरोग अनेक वेळा वर्षानुवर्षे असक्रिय (dormant) स्थितीत राहू शकतो. सुरुवातीचा संसर्ग बरा झाल्यानंतरही त्याचे परिणाम नंतर दिसू शकतात.म्हणूनच अशा रुग्णांसाठी गर्भाशय पुन्हा कार्यक्षम बनवण्यासाठी पीआरपी, हिस्ट्रोस्कोपी, मेट्रोप्लास्टीसारखे उपचार महत्त्वाची भूमिका बजावतात.

Web Title: Woman trying to conceive baby since 7 years doctor treated with prp result will shock you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Health Tips
  • pregnancy
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
1

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
2

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
3

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’
4

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.