प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या वनस्पती
निसर्गाने आपल्याला अशा अनेक देणग्या दिल्या आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 4 वनौषधींबद्दल सांगणार आहोत, ज्या पावसाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील. पावसाळ्यामध्ये अनेक आजार माणसांना घेरत असलेले दिसतात.
ताप, सर्दी आणि खोकला हे तर अत्यंत सामान्य आजार आहेत. मात्र त्यासह डेंगू, मलेरिया, टायफॉईड अशा अनेक वेगवेगळ्या आजारांनाही पावसाळामुळे निमंत्रण मिळते. मात्र या आजारांपासून दूर राहण्यासाठी अनेक आयुर्वेदिक वनस्पती फायदेशीर ठरतात. या लेखातून आम्ही तुम्हाला अशा 4 वनस्पतींबाबत सांगणार आहोत, ज्या तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याचा फायदा सांगितला आहे. (फोटो सौजन्य – iStock)
गुळवेल
प्रतिकारशक्तीसाठी गुळवेलाचा उपयोग
गुळवेल ही औषधीय वनस्पती असून ‘अमरबेल’ असेही म्हणतात. गुळवेल हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या शक्तींसाठी ओळखली जाते. गुळवेलामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.
सेवन कसे करावेः 2-3 चमचे गुळवेलाचा रस अथवा गुळवेलाची पावडर 2-3 चमचे पाण्यात मिसळून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. गुळवेल हे सरबत, कॅप्सूल किंवा अर्काच्या स्वरूपातही बाजारात सहज उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा – पावसाळ्यातील आजारांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक वनस्पती आहेत फायदेशीर
मुलेठी
मुलेठी ठरते वरदान
पावसाळ्यात लाभदायक ठरणारी आणखी एक औषधी वनस्पती म्हणजे लिकोरिस ज्याला मुलेठी या नावाने ओळखले जाते. खोकला, सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळण्यास यामुळे मदत होते. मुलेठीमध्ये अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.
सेवन कसे करावे: 10 ग्रॅम मुलेठीचे वाळलेले मूळ घेऊन पावडर बनवा. त्यानंतर ही पावडर 20 ग्रॅम चहाच्या पानात मिसळून प्या.
तुळस
तुळस आहे बेस्ट इम्युनिटी बुस्टर
तुळशीला ‘सर्वगुण औषध’ असे म्हणतात. ही एक पवित्र औषधी वनस्पती आहे जी अनेक आरोग्य फायद्यांनी समृद्ध आहे. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करतात.
सेवन कसे करावे: एका ग्लास पाण्यात 3-4 तुळशीची पाने टाका आणि उकळा. दिवसातून 2-3 वेळा चहासारखे प्या. तुळशीच्या पानांची पावडर आणि तुळशीचे पंचांग रसही बाजारात उपलब्ध आहे, त्याचाही तुम्ही वापर करून घेऊ शकता.
हेदेखील वाचा – बदलत्या ऋतूंमध्ये निरोगी राहण्यासाठी सकाळी प्या ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा
अश्वगंधा
आयुर्वेदातील उत्तम वनस्पती
त्याला भारतीय जिनसेंग असेही म्हणतात. हे विविध प्रकारच्या संक्रमणांशी लढण्यासाठी उपयुक्त आहे आणि तणाव देखील कमी करते. हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित मानले जाते, परंतु काही विशेष परिस्थितींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, लहान मुले, गर्भवती किंवा स्तनपान करणारी महिला, थायरॉईड आणि ऑटोइम्यून रोगग्रस्तांनी सल्लामसलत केल्यानंतरच त्यांचे सेवन करावे.
सेवन कसे करावे: एक चतुर्थांश ते अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दोन कप पाण्यात उकळवा. थोडे आले पण टाका. त्यात मधात मिसळून प्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.