Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वजन कमी करायला जाल, माघारी कॅन्सर घेऊन याल…’ Weight Lossसाठी ‘हा’ डाईट मुळीच करू नका

नवीन संशोधनानुसार, कीटो आणि लो-कार्ब डाएटमुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो, कारण हे आहार आतड्यांमध्ये विषारी घटक वाढवतात. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे आणि कोणत्याही डाएटपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2025 | 07:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वजन वाढणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या पद्धतींनी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, काही डाएट पद्धती लांब पल्ल्यात शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. नवीन संशोधनानुसार कीटो डाएटसारख्या कमी कार्बोहायड्रेट असलेल्या आहारामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. संशोधनानुसार, लो-कार्ब डाएटमुळे आतड्यांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरशी संबंधित विषारी घटक वाढतात. सामान्यतः लो-कार्ब डाएट मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते आणि वजन झपाट्याने कमी करण्यास प्रभावी मानली जाते. मात्र, काही लो-कार्ब डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे भूक कमी होते आणि शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते. परंतु, अशा आहाराचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात.

International Women’s Day 2025: आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या आई, बहीण, बायकोला द्या ‘महिला दिना’च्या शुभेच्छा

संशोधनानुसार, कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच कमी केल्यास आतड्यांमधील ई. कोली बॅक्टेरिया कोलीबैक्टिन नावाचा विषारी घटक तयार करतो. या विषारी घटकामुळे कोलनमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात, ज्यामुळे ट्यूमर होण्याची शक्यता वाढते. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये असे आढळून आले की, पूर्णपणे कार्बोहायड्रेट टाळल्यास कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मात्र, हे निष्कर्ष अद्याप मानवावर चाचणीद्वारे सिद्ध व्हायचे आहेत.

संशोधनासाठी तीन प्रमुख जिवाणूंचा अभ्यास करण्यात आला – बॅक्टेरॉइड्स फ्रॅगिलिस, हेलिकोबॅक्टर हेपेटिकस आणि ई. कोली स्ट्रेन NC101. हे जिवाणू आतड्यांमध्ये सूज निर्माण करतात आणि कॅन्सरसाठी पोषक वातावरण तयार करतात. विशेषतः ई. कोली NC101 हा बॅक्टेरिया ६०% कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आढळतो. उंदरांवर झालेल्या प्रयोगांमध्ये असे दिसून आले की, कमी कार्बोहायड्रेट असलेले आहार घेतलेल्या उंदरांमध्ये कोलीबैक्टिन हा विषारी घटक अधिक प्रमाणात आढळला, ज्यामुळे त्यांच्या कोलन सेल्समध्ये डीएनएचे नुकसान झाले आणि ट्यूमर वाढला.

International Women’s Day 2025 निमित्त Images, Wishes, Quotes, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!

अर्थात, याचा अर्थ असा नाही की खूप जास्त कार्बोहायड्रेट खाणेही सुरक्षित आहे. अतिरीक्त कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढणे, ब्लड शुगर नियंत्रण बिघडणे, टाईप-२ डायबेटिस आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोणत्याही फडतूस डाएटचा अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि चांगले फॅट्स असलेला आहार घेतल्यास शरीर तंदुरुस्त राहू शकते आणि अनावश्यक धोके टाळता येतात.

Web Title: Disadvantages of doing the keto diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Health Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
1

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
2

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
3

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
4

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.