पिकलेली खायला अजिबात आवडत नाही, मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचा मऊ स्वादिष्ट शिरा, नोट करा रेसिपी
Banana Sheera: दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. घरात केळी, सफरचंद, पेरू इत्यादी फळे आणली जातात. पण केळी जास्त पिकल्यानंतर लहान मुलांसह मोठेसुद्धा खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी केळी फेकून देण्याऐवजी केळीपासून शिरा बनवावा. या पद्धतीने बनवलेला केळीचा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी किंवा नैवेद्याच्या ताटात सुद्धा केळीचा शिरा बनवून ठेवू शकता. हा शिरा बनवण्याची ५ ते १० मिनिटं लागते. कायमच तेच ठराविक पदार्थ बनवून खाण्याऐवजी नेहमीच काहींना काही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहावे. हा पदार्थ मधुमेहाचे रुग्ण सुद्धा खाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया केळीचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






