Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी दिवाळीपूर्वी घर स्वच्छ ठेवणे, मुख्य दरवाजात रांगोळी काढणे, तोरण लावणे आणि संध्याकाळी दिवे लावणे अशा गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 06, 2026 | 12:45 PM
Diwali Lakshmi Puja 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Diwali Lakshmi Puja 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लक्ष्मीपूजनाचे 7 महत्त्वाचे नियम
  • धनलाभासाठी 6 खास उपाय
  • सुख-समृद्धीसाठी करा या गोष्टी

दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एकच असतं, देवी लक्ष्मीने आपल्या घरात यावं. घरात सुख, शांती, पैसा सगळं टिकून राहावं. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि गणपतीची मनोभावे पूजा करतो.असं म्हणतात की दिवाळीला मनापासून पूजा केली तर घरातली आर्थिक अडचण दूर होते आणि धनलाभ होतो. पण पूजा फक्त फुलं वाहून होत नाही. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी पाळाव्या लागतात. Diwali Lakshmi Puja 2026:

लक्ष्मीला प्रसन्न करायला काय काय करायचं.

1. घर एकदम स्वच्छ ठेवा

लक्ष्मी स्वच्छ घरात येते असं आपले आजी-आजोबा सांगायचे. ते खरंच आहे. दिवाळी आधी घरातली धूळ, कचरा, नको असलेल्या वस्तू बाहेर काढा. खास करून मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर हे तीन ठिकाणं तर चकाचक ठेवा.

2. दारात रांगोळी काढा

दिवाळीला दारात सुंदर रांगोळी काढणं हे शुभ असतं. सोबत दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा फुलांचं तोरण लावा. घरात शिरतानाच प्रसन्न वाटतं. घरात चांगली ऊर्जा येते.

3. संध्याकाळी दिवा लावा

दिवाळीत संध्याकाळ झाली की दारात, देवघरात, अंगणात दिवे लावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणं चांगलं मानतात. घर अंधारात ठेवू नका.

4. पूजेला स्वच्छ कपडे घाला

लक्ष्मीपूजन करताना स्वच्छ कपडे घाला. लाल, पिवळा असा प्रसन्न रंगाचा कपडा घातला तर छान. पूजेच्या जागी लाल किंवा पिवळं कापड अंथरा, त्यावर लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवा. मग फुलं, अक्षता, हळद-कुंकू वाहून नैवेद्य दाखवा.

Diwali Diya Lighting Tips: वारा आला, तरी दिवा विझणार नाही? नेलपेंटच्या ‘या’ भन्नाट ट्रिकची होतेय चर्चा

5. घरात भांडण नको

दिवाळीच्या दिवशी घरात शांतता ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालू नका, रागाने बोलू नका. सगळ्यांनी प्रेमाने वागलं तर घरात लक्ष्मी टिकते. भांडणाच्या घरात लक्ष्मी थांबत नाही असं म्हणतात.

6. अन्न आणि पैशाची उधळपट्टी नको

लक्ष्मी ही धनाची देवी आहे. त्यामुळे दिवाळीत अन्न, पाणी, पैसा उगाच वाया घालवू नका. गरज असेल तेवढाच खर्च करा. अन्नाचा आदर करा. ताटात टाकू नका.

7. गरजूंना दान करा

दिवाळीला आपल्या क्षमतेनुसार गरजू माणसाला अन्न, कपडे, धान्य किंवा थोडी आर्थिक मदत करा. मनापासून केलेलं दान लक्ष्मीला खूप आवडतं. याने मनाला पण शांती मिळते.

धनासाठी हे 6 उपाय करून बघा

1. कमळाचं फूल वाहा

लक्ष्मीला कमळाचं फूल सगळ्यात जास्त आवडतं असं ग्रंथात लिहिलंय. त्यामुळे पूजेच्या दिवशी देवीला एक कमळाचं फूल नक्की वाहा.

2. लक्ष्मी मंत्र म्हणा

पूजा करताना ‘ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः’ हा मंत्र 108 वेळा म्हणा. मन एकाग्र होतं आणि पूजा मनापासून होते.

3. खिरीचा नैवेद्य दाखवा

देवीला खीर, लाडू किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. नंतर तो प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटा. याने घरात आनंद राहतो.

4. तिजोरीची पण पूजा करा

दिवाळीला तिजोरी किंवा पैसे ठेवायची जागा स्वच्छ करा. काही घरात नाण्यांची आणि पैशांची पण पूजा करतात. याने आर्थिक स्थैर्य येतं असं मानतात.

Diwali Eye Safety: दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी ‘या’ टिप्स करा फाॅलो

5. दारात दिवा ठेवा

संध्याकाळी मुख्य दाराजवळ एक दिवा लावा. हा दिवा म्हणजे लक्ष्मीच्या स्वागतासाठी असतो. पण दिवा लावताना तो सुरक्षित ठिकाणी ठेवा, पडद्यापासून लांब ठेवा.

6. मनापासून पूजा करा

सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे पूजा मनापासून करा. फक्त विधी म्हणून नको. देवीकडे मागणं मागण्यापेक्षा आभार माना.या दिवाळीत हे छोटे छोटे नियम पाळून बघा. घरात नक्कीच वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीत लक्ष्मीपूजनापूर्वी काय करावे?

    Ans: घर स्वच्छ करून मुख्य दरवाजात रांगोळी काढावी आणि तोरण लावावे.

  • Que: लक्ष्मीपूजनासाठी कोणता मंत्र म्हणावा?

    Ans: 'ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

  • Que: देवी लक्ष्मीला कोणते फूल वाहावे?

    Ans: लक्ष्मीपूजनात कमळाचे फूल वाहणे शुभ मानले जाते.

Web Title: Diwali lakshmi puja 7 rules 6 remedies for wealth rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • lifesytle news
  • lifesytyle
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dhanteras Gold Investment Guide : धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी? दागिने, कॉईंन की गोल्ड ETF; गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?
1

Dhanteras Gold Investment Guide : धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी? दागिने, कॉईंन की गोल्ड ETF; गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी
2

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Cotton import duty: कापूस आयातीला 0% शुल्काचा फटका! सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक
3

Cotton import duty: कापूस आयातीला 0% शुल्काचा फटका! सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक

Latur Drought: शेतकऱ्यांसाठी खरी दुष्काळी मदत लवकरच जाहीर होणार! मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
4

Latur Drought: शेतकऱ्यांसाठी खरी दुष्काळी मदत लवकरच जाहीर होणार! मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.