Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

सध्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे आणि विविध कॅन्सर लोकांना होताना दिसून येत आहेत. मात्र वेळीच निदान झाल्यास आणि सुरूवातीची लक्षणे कळल्यास कॅन्सरवर मात करणे अधिक सोपे होऊ शकते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 30, 2026 | 07:03 PM
हेड नेक कॅन्सरची लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

हेड नेक कॅन्सरची लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • हेड नेक कॅन्सरची लक्षणे कोणती 
  • सुरूवातीची लक्षणे कशी ओळखावी 
  • लवकर निदान होणे गरजेचे 
तोंडात किंवा घशामध्ये झालेली जखम, गाठ किंवा आवाजात झालेला बदल याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र हीच लक्षणे हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लवकर निदानाने कॅन्सरवर मात करणे शक्य असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. 

भारतात सर्व कॅन्सर रुग्णांपैकी अंदाजे 26 % ते 30 % रुग्णांना हेड आणि नेक कॅन्सर आहे, ज्याचे प्रमुख कारण तंबाखू, गुटखा, बीडी,सिगरेटचे सेवन आणि इतर सवयींशी संबंधित आहे. हे प्रमाण इतर कर्करोगांच्या तुलनेत अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) अंतर्गत IARC – Global Cancer Observatory नुसार जगभरात सुमारे 9.3 ते 9.5 लाख नवीन हेड आणि नेक कॅन्सरची प्रकरणे नोंदली गेली. देशात दरवर्षी सुमारे १० ते १२ लाख नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळतात. यापैकी जवळपास ३० टक्के कर्करोग हे हेड ॲण्ड नेक कर्करोगाचे असतात. 

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत

काय आहेत लक्षणे 

तंबाखू, गुटखा, धूम्रपान, दारूचे व्यसन तसेच काही विषाणुजन्य संसर्ग ही या कॅन्सरची प्रमुख कारणं मानली जातात. विशेष म्हणजे हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेल्यास पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक असते.

तज्ज्ञांच्या मते, तोंडात तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखम, गालाच्या आत पांढरे किंवा लाल चट्टे, गिळताना त्रास होणे, सतत घसा दुखणे, मानेला गाठ येणे किंवा आवाजात बदल ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे 

याबाबत माहिती देताना डॉ. प्रथमेश पै, प्रमुख – हेड अँड नेक कॅन्सर विभाग, ग्लेनईगल्स हॅास्पिटल, मुंबई यांनी सांगितले की, बहुतेक रुग्ण डॉक्टरांकडे येण्यास विलंब करतात. सुरुवातीच्या टप्प्यात आढळलेला हेड-नेक कॅन्सर ८० ते ९० टक्के प्रकरणांमध्ये यशस्वीरीत्या बरा होऊ शकतो. त्यामुळे तोंडातील कोणत्याही जखमेकडे दुर्लक्ष करु नका.

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तनवीर अब्दुल मजीद यांनी तंबाखूच्या सवयींबाबत इशारा देताना सांगितले की,तंबाखू आणि दारूच्या व्यसनांमुळे हेड ॲण्ड नेक कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. जनजागृती, नियमित तपासणी आणि सवयींमध्ये बदल हेच या कॅन्सरपासून संरक्षणाचे प्रभावी मार्ग आहेत.

Early Breast Cancer: स्‍तनाच्‍या कर्करोगाच्‍या सुरुवातीच्या काळात जवळच्या माणसांचा पाठिंबा गरजेचा, काय सांगतात तज्ज्ञ

कसा टाळता येईल धोका 

हेड आणि नेक कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, यासाठी योग्य जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तंबाखू, गुटखा, खैनी, मावा, सुपारी,बीडी व सिगारेटचे सेवन हे या कॅन्सरला कारणीभूत घटक असून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे हा प्रतिबंधाचा पहिला आणि प्रभावी उपाय आहे. दारूचे सेवन पूर्णपणे बंद करणे, तंबाखू आणि दारू, सुपारी यांचा एकत्रितरित्या वापर हा हेड ॲण्ज नेक कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढवतो असेही डॉ. पै यांनी स्पष्ट केले.

मौखिक स्वच्छता राखणे आणि नियमित दंत तपासणी करून घेणे हेही प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संतुलित व पोषक आहार, विशेषतः फळे व हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तोंडात किंवा घशात झालेली कोणतीही जखम, गाठ किंवा असामान्य बदल हे 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहिल. विशेषतः पुर्वी तंबाखू सेवन करत असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉ. तनवीर यांनी दिला आहे. 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कॅन्सरची भीती बाळगण्याऐवजी जागरूक राहावे, वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि तंबाखूमुक्त जीवनशैली स्वीकारावी. लवकर निदान झाल्यास उपचार सुलभ होतात आणि रुग्णांचे जीवनमानही सुधारते.

 

Web Title: Do not ignore sores in the mouth early symptoms of head and neck cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Health Tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर
2

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
3

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
4

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.