हाडांमध्ये वाढलेल्या सामान्य वेदना असू शकतात Bone Cancer चे संकेत, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू
हाडांच्या कॅन्सरची लक्षणे?
हाडांचा कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सरच्या आजारात झपाट्याने वाढ का होत आहे?
जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर पायाखालील जमीन सरकल्यासारखे वाटते. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षानंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण व्हायची. मात्र जीवनशैलीतील बदल, मानसिक तणाव, आहारात होणारे बदल इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे तरुण वयातच कॅन्सरची लागण होते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होऊ शकतो. हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. याला ऑस्टियोसारकोमा असे सुद्धा म्हणतात. उभे राहणे, खाली बसणे, कोणतेही काम करण्यासाठी शरीरातील हाडे कायमच मजबूत लागतात. हाडांच्या साच्यावर संपूर्ण शरीराचा भार असतो. हाडांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. हाडांमध्ये सतत होणाऱ्या वेदना, सूज येणे किंवा लहानशा दुखापतीमुळे फ्रॅक्चर इत्यादी गोष्टींकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
हाडांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सामान्यपणे दिसून येणारे लक्षण म्हणजे शरीराच्या कोणत्याही अवयवावरील हाडांमध्ये खोलवर वेदना होणे. या वेदना खूप जास्त तीव्र असतात. साध्या पेनकिलरच्या गोळ्या किंवा आराम केल्यानंतर सुद्धा तुमच्या वेदना कमी होत नसतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. हाडांमध्ये वाढलेल्या कॅन्सरच्या अनियमित पेशी आणि ट्युमरमुळे या वेदना होण्याची शक्यता असते.
कॅन्सरच्या पेशी वाढू लागल्यानंतर हाडांमध्ये गाठी किंवा सूज येण्याची जास्त शक्यता असते. कॅन्सरच्या पेशी झपाट्याने वाढल्यामुळे ही गाठ हळूहळू मोठी होऊ लागते. तसेच या गाठीला स्पर्श केल्यानंतर खूप जास्त वेदना किंवा उबदारपणा जाणवतो. त्यामुळे कोणत्याही हाडांमध्ये वेदना किंवा लहान गाठी जाणवू लागल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घेऊन आजाराचे निदान करावे.
कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरातील हाडे खूप कमकुवत होऊन जातात. कुठेही पडल्यानंतर किंवा लहानशा धक्यानेसुद्धा हाडे तुटण्याची शक्यता असते. वारंवार हाडांमध्ये फ्रॅक्चर वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. तसेच कॅन्सर झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येते. याशिवाय वजन झपाट्याने कमी होऊन जाते. विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा काहीस फरक दिसून येत नाही.
Ans: प्रभावित भागात सतत वेदना, हाडे कमकुवत होऊन विनाकारण फ्रॅक्चर होणे.
Ans: हाडांच्या पेशींच्या डीएनए (DNA) मध्ये बदल झाल्यामुळे कर्करोग होतो, परंतु त्याचे नेमके कारण नेहमीच स्पष्ट नसते.
Ans: होय, जर रोगाचे निदान लवकर झाले आणि त्यावर योग्य उपचार केले गेले, तर अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, विशेषतः जर कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरलेला नसेल.






