Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पदार्थांसोबत चुकूनही करू नका लिंबाचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होईल भयंकर विष, उद्भवेल पचनाची समस्या

लिंबासोबत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे आतड्यांमध्ये विष तयार होऊन शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे लिंबासोबत हे पदार्थ खाऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: May 17, 2025 | 01:19 PM
'या' पदार्थांसोबत चुकूनही करू नका लिंबाचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होईल भयंकर विष

'या' पदार्थांसोबत चुकूनही करू नका लिंबाचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होईल भयंकर विष

Follow Us
Follow Us:

चवीला आंबट गोड असलेला लिंबू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, फोड कायमचे घालवण्यासाठी तुम्ही नियमित लिंबाचे सेवन करू शकता. विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफाय गुणधर्मांनी समृद्ध असलेले लिंबू आरोग्यासाठी महत्वाचे आहे. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीराला अनेक फायदे सुद्धा होतात. जेवणातील पदार्थांसोबत लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)

आतड्यांमध्ये घाण होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्यात मिक्स करा ‘हा’ पांढरा पदार्थ, पोटावरील चरबी होईल कमी

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाणी प्यायले जाते. पण चुकीच्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. यामुळे आतड्यांचे कार्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिंबासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडणे, उलट्या इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात .

दुग्धजन्य पदार्थ:

लिंबसोबत चुकूनही दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडू शकते. लिंबू आणि दूध हे पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे पदार्थ खाल्यानंतर पचनावर ताण येतो ज्यामुळे उलट्या मळमळ किंवा ऍसिडिटीची समस्या वाढू शकते. तसेच शरीरातील कॅल्शियम शोषणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यानंतर दूध किंवा पनीरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया बिघडेल.

खिचडी किंवा डाळी:

रोजच्या आहारात सगळेच लोक डाळ भात किंवा खिचडीचे सेवन करतात. आहारातील या पदार्थांमध्ये जास्त प्रथिने आढळून येतात. मात्र लिंबूमधील अ‍ॅसिडिक घटक सर्व प्रथिने शोषून घेतात. ज्यामुळे शरीरातील प्रथिनांची पातळी कमी होऊन जाते. शरीराला आवश्यक असलेली प्रथिने मिळत नाही. त्यामुळे डाळभात किंवा खिचडी खाताना त्यावर लिंबू पिळून खाऊ नये. असे केल्यामुळे अपचन, ऍसिडिटी वाढू शकते.

अंडी:

आरोग्यासाठी अंडी अतिशय पौष्टिक आहेत. अंडी खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. पण अंडी खाल्यानंतर लिंबाच्या रसाचे किंवा लिंबाचे सेवन करू नये. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात, मात्र त्यावर लिंबू पिळून खाल्यास अंड्यांमधील प्रथिने कमी होऊन जाते. त्यामुळे अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांवर लिंबू पिळून खाऊ नये.

लिव्हर आतून पोखरून काढतो Hepatitis आजार, कसे ठेवाल Liver सुरक्षित

काकडी:

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडी खाल्ली जाते. काकडी किंवा काकडीचा रस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. काकडी आणि लिंबाचे कॉम्बीनेशन आयुर्वेदिक दृष्ट्या चांगले नाही. यामुळे शरीराचे संतुलन बिघडून जाते. त्यामुळे काकडीवर कधीच लिंबू पिळून खाऊ नये. असे केल्यास संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि पचनक्रिया बिघडते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do not mistakenly consume lemon with these foodsterrible poison will be formed in the intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Lemons
  • side effect

संबंधित बातम्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
1

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
2

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
3

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.