आतड्यांमध्ये घाण होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्यात मिक्स करा 'हा' पांढरा पदार्थ
बिघडलेल्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. यामुळे लठ्ठपणा वाढणे, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. जीवनशैलीतील बदलांमुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसू लागतात. सकाळी उठल्यानंतर बरीच लोक लिंबू पाणी, जिऱ्याचे पाणी किंवा इतर पदार्थांपासून तयार केलेले पाणी पितात. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. मात्र हल्ली सोशल मीडियावर नवीन आलेला ‘सोल्ट वॉटर फ्लश’ ट्रेंड अनेक लोक फॉलो करत आहेत. एक ग्लास कोमट पाण्यात मीठ टाकून प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित कोमट पाण्यात मीठ टाकून प्यावे. यामुळे शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी मिठाचे पाणी पिणे हा उत्तम पर्याय आहे. मिठामध्ये असलेले मिनरल्स पचन संस्थेवर चांगला परिणाम करतात. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण सहज बाहेर पडून जाते. तसेच वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते.
मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढते आणि शरीराच्या अवयवनांवर साचून राहिलेला चरबीचा थर कमी होतो. मिठाचे पाणी शरीराला इलेक्ट्रोलाइट्स देतात आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. हा उपाय महिनाभर नियमित केल्यास वजन नियंत्रणात राहण्यस मदत होईल.
वजन कमी करताना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराची भूक नियंत्रणात राहते आणि लवकर खाण्याची इच्छा होत नाही. सकाळी मिठाचे पाणी प्यायल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटू लागते. यामुळे शरीरात अनावश्यक कॅलरीज जात नाहीत. वजन कमी करताना मिठाच्या पाण्याचे नियमित सेवन करावे.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेली जळजळ, ऍसिडिटी आणि इतर समस्यांपासून तात्काळ आराम मिळेल. वजन कमी करताना रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून प्यावे. पण जास्त प्रमाणात मिठाचावापर करून नये. पाण्यात चिमूटभर मीठ टाकावे.