हेपेटायटिसमुळे लिव्हरवर होणारे परिणाम
हेपेटायटीस म्हणजे यकृताची जळजळ अर्थात लिव्हरमध्ये सतत जळजळ होत राहते. याचा अर्थ असा होतो की तुमचे लिव्हर निरोगी नाही आणि हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. आजकाल सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे दारू. नियमितपणे जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अल्कोहोलिक हेपेटायटीस होऊ शकतो, जो वाढत्या प्रमाणात सामान्य होत आहे. म्हणून, अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहणे चांगले.
हेपेटायटिसचा लिव्हरवर नक्की काय परिणाम होऊ शकतो आणि कशा पद्धतीने लिव्हर सुरक्षित ठेवायला पाहिजे याबाबत डॉ. अमोल डहाळे, कन्स्लन्टंट गॅस्ट्रोअँट्रोलॉजिस्ट, डी. वाय. पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्ही या लेखातून योग्य ती माहिती मिळवू शकता (फोटो सौजन्य – iStock)
हेपेटायटिस होण्याचे कारण
हेपेटायटिस नक्की कसा होतो
तज्ज्ञ गॅस्ट्रोअँट्रोलॉजिस्ट यांनी सांगितले की, डॉक्टरांना न विचारता ओव्हर-द-काउंटर (ओटीसी) औषधे घेणे हे हिपॅटायटीस होण्याचे एक कारण आहे. अनेक वेदनाशामक आणि इतर सामान्य औषधे जास्त प्रमाणात किंवा वारंवार घेतल्यास लिव्हरचे नुकसान करू शकतात. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कोणत्याही आजारावर स्वतःच्या मनाने औषध घेणे हानिकारक ठरू शकते
त्वचेला येतेय खाज आणि जाणवत असतील 5 संकेत, तर Liver सडून गंभीर आजार होण्याची शक्यता
लिव्हर एक सायलंट अवयव
यकृत आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची कार्ये करते, परंतु जोपर्यंत त्याचा वाईट परिणाम होत नाही तोपर्यंत ते कोणतीही लक्षणे दाखवत नाही. म्हणून प्रतिबंध खूप महत्वाचा आहे. खूप उशीर होण्यापूर्वी तुमच्या यकृताची काळजी घ्या. सुज्ञ निर्णय घ्या, जागरूक रहा आणि निरोगी जीवन जगा. अनेकदा लिव्हरमध्ये होणारा त्रास हा अति झाल्याशिवाय जाणवत नाही आणि म्हणूनच याला सायलंट अवयव असं म्हटलं जातं. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि सावध राहणेही तितकेच आवश्यक आहे.
किडनी लिव्हर होईल डिटॉक्स! उपाशी पोटी नियमित करा पाण्याचे सेवन, शरीराला होतील कमालीचे फायदे
लिव्हर हेल्दी कसे ठेवाल
लिव्हर सुरक्षित राहण्यासाठी काय करावे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.