Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांच्या नसा सतत ब्लॉक होतात? मग ‘हे’ सोपे उपाय करून मिळवा आराम, पायांच्या वेदनांपासून मिळेल सुटका

पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर कोणते उपाय करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 18, 2025 | 02:45 PM
पायांच्या नसा ब्लॉक झाल्यास 'हे' घरगुती उपाय करावे

पायांच्या नसा ब्लॉक झाल्यास 'हे' घरगुती उपाय करावे

Follow Us
Follow Us:

सततच्या धावपळीमुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. नेहमी नेहमी काम करत राहिल्यामुळे हातपाय दुखणे, गुडघे दुखी, कंबरदुखी इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी आहारात बदल करून शरीराला पचन होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये हातापायांमध्ये मुंग्या येणे, पायाच्या नसा ब्लॉक होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. पायांच्या नसा ब्लॉक होण्यामागे अनेक कारण आहेत. पायांच्या नसा ब्लॉक होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे, कारण हे हृदयविकाराचा झटका येण्यामागचे महत्वपूर्ण कारणं आहे.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. अन्यथा मोठे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. पण पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर गंभीर समस्या नसल्यास घरगुती उपाय करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला पायांच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पायांच्या नसा ब्लॉक होणार नाहीत.

पायांच्या नसा ब्लॉक झाल्यास ‘हे’ घरगुती उपाय करावे:

गरम पाण्यात पाय ठेवणे:

पायाच्या अडकलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवून बसावे. यामुळे पायांच्या नसा मोकळी होतील आणि इतर गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. गरम पाण्यात पाय ठेवल्यामुळे पायाला आलेली सूज कमी होते, शिवाय पायांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. पायांच्या सर्व वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवून बसावे.

पोषण आहार घ्यावा:

शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात कॅल्शियम, फायबर, लोह आणि सोडियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, संपूर्ण धान्य इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर:

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर केल्यामुळे पायांच्या अडकलेल्या नसा मोकळ्या होण्यास मदत होईल. यासाठी एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कापसावर घेऊन पायांच्या नसांवर लावून घ्या. यामुळे काही तासांमध्ये फरक दिसून येईल. या पदार्थाच्या मदतीने वैरिकास व्हेन्सची समस्या कमी होते आणि आराम मिळतो.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

आल्याच्या चहाचे सेवन:

आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी टोपात पाणी गरम करून आलं किसून टाका. त्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून त्यात मध मिक्स करून घ्या. यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होतील आणि आराम मिळेल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Do these home remedies if the veins in the legs are blocked varicose vein home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
1

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
3

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.