किळसवाण्या पाली क्षणार्धात पडून जातील बाहेर!
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये घराच्या भितींवर, किचनमध्ये किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात नेहमीच सगळ्यांना पाली फिरताना दिसतात. पाल पाहिल्यानंतर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच खूप जास्त घाबरतात. पण किळसवाण्या पाली घराच्या किचनमध्ये सतत फिरत असतात. पाल अतिशय घाण आणि रोगराई पसरवणारी असते, असे अनेकांना वाटत. घरात पाहुणे किंवा लहान मुलं खेळत असताना अचानक पाल दिसली की लाजिरवण्यासारखे वाटू लागते. घरात येणाऱ्या पाली घालवण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे स्प्रे आणून भितींवर मारले जातात, तर कधी डांबरी गोळ्या आणून किचनमध्ये ठेवल्या जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरात पाली येऊ नये म्हणून काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास घराच्या आजूबाजूला सुद्धा पाली फिरकणार नाहीत. (फोटो सौजन्य – istock)
5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार
कांदा लसूणच्या वासाने घरात पाली येत नाहीत. यासाठी किचनच्या कानाकोपऱ्यात कांदा लसुणचा वापर करून बनवलेला स्प्रे मारावा. यामुळे किचनमधील पाली कायमच्या गायब होतील. कांदा आणि लसुणचा उग्र वास पालींना आवडत नाही. याशिवाय किचनच्या कोपऱ्यात तुम्ही कांदा किंवा लसूण पाकळी सुद्धा ठेवू शकता. यामुळे पाली येणार नाहीत.
स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात लाल तिखट टाकून मिक्स करा. तयार केलेला स्प्रे किचन किंवा पाल येते त्या ठिकाणी मारल्यास घरात कधीही पाल येणार नाही. मिरचीच्या वासामुळे पाली घरात येत नाहीत. याशिवाय अंड बनवल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून किचनच्या इथे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवल्यास घरात पाली येणार नाहीत.
टोपात पाणी गरम करून त्यात कडुलिंबाची पाने टाकून उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करा. थंड झालेले पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. त्यानंतर हा स्प्रे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मारल्यास अजिबात पाली येणार नाहीत. घरात सतत जर पाली येत असतील तर कुठेही अन्नपदार्थ उघडे ठेवू नये.
दारू प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये प्यावे की स्टीलच्या? आरोग्य जपण्यासाठी नक्की वाचा