Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत तोंड येऊन हिरड्या जिभेवर लालसर फोड येतात? शरीरात वाढलेल्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

तोंडात आलेले अल्सर लवकर बरे करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. पण त्यामुळे सुद्धा तोंडात आलेल्या जखमा किंवा फोड लवकर बरे झाले नाहीतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 05:30 AM
सतत तोंड येऊन हिरड्या जिभेवर लालसर फोड येतात? शरीरात वाढलेल्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

सतत तोंड येऊन हिरड्या जिभेवर लालसर फोड येतात? शरीरात वाढलेल्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Follow Us
Follow Us:

वारंवार तोंड येण्याची कारणे?
तोंडात येणाऱ्या जखमांवर घरगुती उपाय?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे तोंड येते?

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरसंबंधित असंख्य समस्या वाढू लागतात. त्यातील अतिशय सामान्य समस्या म्हणजे तोंड येणे किंवा जिभेवर लालसर फोड येणे. जिभेवर, ओठांच्या आतील बाजूस किंवा हिरड्यांवर छोटे पांढरे किंवा लालसर फोड काहीवेळा खूप जास्त वेदनादायी वाटतात. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे जिभेच्या आतील भागात वेदनादायी फोड येतात, ज्याच्या परिणामामुळे काही खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. पाणी पिताना सुद्धा खूप जास्त त्रास होतो. जिभेवर किंवा ओठांच्या आतील भागात वारंवार फोड येत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. हे फोड केवळ कमी पाण्याच्या सेवनामुळे नाहीतर शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे, पोषक घटकांचा अभाव, झोपेची कमतरता, पोषणतत्त्वांची कमतरता किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे तोंडात फोड येण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया तोंड आल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

गर्भपातामुळे नोकरी जाण्याची महिलांमध्ये भीती! ७.८ कोटी नोकरदार महिलांची चिंता; क्वेस्ट ग्लोबलने यूगव्हच्या सहकार्याने केले संशोधन

तोंडात आलेले लालसर फोड कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

तोंडात आलेले लालसर फोड कमी करण्यासाठी सर्वप्रथम नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाणी किंवा डिटॉक्स वॉटर प्यावे. यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि आतडे स्वच्छ होतात. तोंडात झालेल्या जखमांमुळे जळजळ वाढल्यास पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. यामुळे जखमेवरील जंतू नष्ट होतात आणि जखम भरण्यास मदत होईल.

हिंदू धर्मात तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. तुळशीच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे तोंडात वाढलेला संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते आणि जखम लवकर सुकून जाते. यासाठी ३ ते ४ तुळशीची पाने घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर तोंडात चघळा. यामुळे तोंडात आलेले फोड, जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होईल.

दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट किंवा अतिप्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यामुळे तोंडात जखमा किंवा हिरड्यांना फोड येण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी मधाचा वापर करावा. मध लावल्यास तोंडात आलेल्या जखमा कमी होऊन आराम मिळतो. याशिवाय मध हे खूप जास्त उष्ण असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात मधाचा वापर करावा. तोंडात आलेल्या जखमांमुळे खूप जास्त आग किंवा जळजळ होत असेल तर दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या आणि थंड पदार्थांचे सेवन करावे.

कोल्ड ड्रिंकच्या सेवनामुळे आतडे आतून सडतात का? पोट आतड्यांसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

तोंडात आलेले फोड २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस तसेच राहिल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. कारण तोंडाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तोंडात जखमा होणे, तोंड येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय शरीरात विटामिन बी१२, फॉलिक अॅसिड किंवा लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर सुद्धा फोड येण्याची शक्यता असते. भरपूर पाणी आणि शरीरास आवश्यक असलेला आहार घेतल्यास शरीर कायमच हेल्दी राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरात उष्णता वाढल्यामुळे तोंड येते का?

    Ans: काही लोकांना शरीरात उष्णता वाढल्यास तोंडात जळजळ किंवा फोड जाणवू शकतात. मात्र तोंड येण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.

  • Que: तोंडातील फोड लवकर बरे करण्यासाठी काय करावे?

    Ans: पुरेसे पाणी प्यावे, तिखट-आंबट पदार्थ कमी करावेत, तोंडाची स्वच्छता राखावी आणि संतुलित आहार घ्यावा.

  • Que: हिरड्यांवर लालसरपणा आणि फोड का येतात?

    Ans: हिरड्यांची जळजळ, संसर्ग, तोंडाची योग्य स्वच्छता न राखणे किंवा पोषणातील कमतरता यामुळे अशी समस्या होऊ शकते.

Web Title: Do you frequently suffer from mouth ulcers and reddish blisters on your gums or tongue try these simple remedies to get relief from excess body heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • infections

संबंधित बातम्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
1

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
2

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
3

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.