
हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? वयाच्या चाळिशीनंतर आहारात नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
हाडांचे आरोग्य कशामुळे बिघडते?
हाडांची घनता वाढवण्यासाठी उपाय?
कॅल्शियम वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. वय वाढल्यानंतर शरीरातील हाडे कमकुवत होतात आणि हाडांची झीज झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. कॅल्शियम, विटामिन डी आणि प्रथिनांची कमतरता, बैठी जीवनशैली, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव इत्यादीमुळे ऑस्टियोपोरोसिस आणि आर्थरायटिसचा धोका वाढण्याची शक्यता असते. वयाच्या ३० व्या वर्षानंतर हळूहळू हाडांची घनता कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे चालताना, खाली बसताना किंवा वर उठताना खूप तीव्र वेदना होतात. हाडांची कमी झालेल्या घनता वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात या कॅल्शियम युक्त पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आर्थरायटिसचा धोका टाळता येईल.(फोटो सौजन्य – istock)
शारीरिक हालचालींचा अभाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, कॅल्शियम आणि विटामिन डी ची कमतरता, धूम्रपान, अति-मद्यपान, लठ्ठपणा, शरीरात होणारे हार्मोनल बदल, जुनाट आजार आणि काही औषधांचा दीर्घकालीन वापर इत्यादी गोष्टींमुळे हाडांची झीज होण्याची शक्यता असते. याशिवाय महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांचे झपाट्याने नुकसान होते आणि शरीराला हानी पोहचते. गुडघ्यांच्या जुनाट आजारांमुळे भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे हाडांसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
किरकोळ पडल्यानंतर फ्रॅक्चर होणे
नखं ठिसूळ होणे
हातापायांमधून सतत मुंग्या येणे
दातांच्या समस्या
थकवा अशक्तपणा
पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना
Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?
हाडांची ताकद वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात दूध, दही, चीज, नाचणी, तीळ, बदाम, सोया उत्पादने आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. तर मांसाहारी लोकांनी आहारात मासे, अंडी आणि काही विशिष्ट सी-फूड्सचा समावेश केल्यास हाडांची कमी झालेली घनता भरून निघेल. अंड्यातील पिवळा बलक, फॅटी फिश आणि फोर्टिफाइड दुग्धजन्य पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात विटामिन डी असते. याशिवाय सकाळच्या कोवळं उन्हात १५ ते २० मिनिटं जाऊन बसल्यास शरीराला नैसर्गिकरित्या विटामिन डी मिळेल आणि हाडे मजबूत होण्यास मदत होईल. शरीरातील हाडे केवळ कॅल्शियमने तयार झालेली नसताना तर प्रथिने आणि इतर आवश्यक घटक हाडांना पोषण देतात.
Ans: सांध्यांमधून आवाज येणे हे काही वेळा सामान्य असू शकते, पण सतत वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास जाणवत असल्यास सांध्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
Ans: वयानुसार हाडांची घनता आणि सांध्यांची लवचिकता कमी होऊ शकते. त्यामुळे संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य जीवनशैली महत्त्वाची ठरते.
Ans: दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, सुका मेवा, तीळ आणि व्हिटामिन D असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते.