Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 वर्ष पोटात ‘दगडाचं मूल’ घेऊन फिरत होती महिला, रिपोर्ट वाचून डोकंच फुटेल; काय आहे नेमका आजार

लिथोपेडिअन ही एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भ गर्भाशयातच मरतो आणि कालांतराने तो कॅल्शियमच्या थराने झाकला जातो आणि दगडात बदलतो, काय आहे हा भयानक आजार?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 25, 2025 | 03:32 PM
पोटात कसा राहू शकतो स्टोन बेबी (फोटो सौजन्य - X.com)

पोटात कसा राहू शकतो स्टोन बेबी (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • ४० वर्ष पोटा होता स्टोन बेबी
  • काय आहे नक्की ही वैद्यकीय स्थिती
  • दगडाचं मूल कसं राहू शकतं पोटात
कधीकधी मानवी शरीरात दुर्मिळ अंतर्गत आणि बाह्य बदल होऊ शकतात. अशा विचित्र बदलांकडे दुर्लक्ष करू नये असे नेहमी सांगितले जाते. पण अनेकदा महिला आपल्या शरीरात होणाऱ्या आजारांकडे आणि त्रासकडे दुर्लक्ष करतात. सध्या कोलंबियामधून वैद्यकीय स्थितीशी संबंधित एक दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे.

येथे एका ७३ वर्षीय महिलेला पोटदुखीचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागले तेव्हा तिला धक्का बसला. तपासणीत असे दिसून आले की गेल्या ४० वर्षांपासून तिच्या पोटात ‘स्टोन बेबी’ आहे. तुम्हालाही वाचून धक्का बसला ना? खरं तर असं काही असू शकतं का असा प्रश्न नक्कीच पडला असेल. काय आहे हा आजार आणि कशी वस्तुस्थिती असू शकते याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. 

काय आहे प्रकरण?

या ८२ वर्षीय महिलेच्या शरीरात सुमारे ४ पौंड (सुमारे १.८ किलो) वजनाचा कॅल्सीफाइड गर्भ होता, ज्याला वैद्यकीय भाषेत लिथोपेडीयन म्हणतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिलेला इतकी वर्षे याबद्दल माहिती नव्हती. एक्स-रे केल्यानंतर डॉक्टरांना ही दुर्मिळ स्थिती समजली. डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करून ते काढून टाकले आहे.

अत्यंत दुर्मिळ स्थिती 

शास्त्रज्ञांनी सांगितले की ही स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे आणि आतापर्यंत वैद्यकीय इतिहासात फक्त ३०० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दर १०००० गर्भधारणेमध्ये फक्त १ प्रकरणात हे घडू शकते. २०१३ मध्ये, कोलंबियातील ८२ वर्षीय महिलेसोबत असाच एक प्रकारचा प्रकार नोंदवण्यात आला होता. तिला पोटदुखी होत होती आणि तपासणीत असे दिसून आले की तिच्या शरीरात ४० वर्षांचे स्टोन बेबी होते.

नवजात बाळाच्या पोटात बाळ! जगात फार दुर्मिळ असणारी ‘ही’ कंडिशन आहे तरी काय? जाणून घ्या

लिथोपेडिअन म्हणजे नक्की काय?

काय आहे ही दुर्मिळ स्थिती

लिथोपेडिअन ही एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भ गर्भाशयात मरण पावल्यानंतर, कालांतराने ते कॅल्शियमच्या थराने झाकले जाते आणि दगडात बदलते. जेव्हा गर्भाशयाऐवजी पोटात गर्भ तयार होतो आणि नंतर गर्भधारणा टिकत नाही, तेव्हा शरीर ते बाहेर काढू शकत नाही. शरीर सुरक्षा प्रक्रिया म्हणून गर्भाला कॅल्शियमने झाकते आणि ते दगडात बदलते.

बेबी स्टोन कसे तयार होतात?

NIH वर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जेव्हा गर्भधारणा गर्भाशयाऐवजी पोटात होते तेव्हा असे होते. पोटातील गर्भाला पुरेसे रक्त मिळत नाही आणि गर्भधारणा अयशस्वी होते. अशा परिस्थितीत, जर गर्भ बाहेर येऊ शकला नाही, तर शरीर स्वतःच त्याचे ‘दगड’ बनवते जेणेकरून कोणताही संसर्ग होणार नाही. ही प्रक्रिया शरीरातील कोणत्याही परदेशी वस्तूला निष्क्रिय करण्यासाठी होते.

कळत का नाही?

लिथोपेडियन तयार झाल्यानंतर, ते कोणत्याही लक्षणांशिवाय अनेक दशके शरीरात राहू शकते. कधीकधी ते फक्त एक्स-रे किंवा इतर चाचण्यांमध्ये आढळते. काही लोक त्यात कोणतीही समस्या नसल्यास ते काढून टाकतही नाहीत.

आजकाल, आधुनिक वैद्यकशास्त्रात, सुरुवातीच्या चाचण्यांमध्येच ही समस्या आढळून येते, त्यामुळे स्टोन बेबीज होण्याची घटना खूपच दुर्मिळ झाली आहे. आजकाल, वैद्यकीय चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड उपलब्ध आहेत जे अशा परिस्थिती लवकर ओळखण्यास मदत करतात, त्यामुळे आता अशा घटना खूप दुर्मिळ आहेत.

भारतातील अतिशय अनोखी घटना! पोटात नाही तर महिलेच्या लिव्हरमध्ये दिसलं बाळ; अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले

लिथोपेडियनचे लक्षण

लिथोपेडियन लक्षणे नसलेला असू शकतो, परंतु कधीकधी त्यामुळे अशी लक्षणे उद्भवू शकतात ज्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लक्षणांमध्ये पेल्विक प्रदेशात वेदना, ओटीपोटात जडपणाची भावना किंवा मोठा, कठीण वस्तुमान यांचा समावेश आहे. या स्थितीचे निदान बहुतेकदा साध्या रेडियोग्राफी किंवा संगणकीय टोमोग्राफी (CT) स्कॅन सारख्या इमेजिंग तंत्रांचा वापर करून केले जाते.

पोस्ट वाचा 

This CT scan belongs to a 73 year old Woman in whom doctors discovered a 30 year old calcified fetus pic.twitter.com/R5Iu8SlTqL — non aesthetic things (@PicturesFoIder) June 24, 2025

 

Web Title: Doctor found stone baby after 40 years in woman stomach diagnosed with lithopedion causes and symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health News
  • pregnancy health

संबंधित बातम्या

झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ सोपा नियम, कायमच राहाल शांत
1

झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ सोपा नियम, कायमच राहाल शांत

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
2

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

थंडीच्या कडाक्यात सुकामेव्याला ऊबदार’ मागणी! दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळतोय दिलासा
3

थंडीच्या कडाक्यात सुकामेव्याला ऊबदार’ मागणी! दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळतोय दिलासा

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली जास्वंदीची फुले शरीरासाठी ठरतील गुणकारी, फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित
4

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली जास्वंदीची फुले शरीरासाठी ठरतील गुणकारी, फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.