Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Heart Day : हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! ‘हे’ छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेताना बहुतांश व्यक्ती कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण, कोलेस्ट्रॉल पातळी नॉर्मल असल्याचा रिपोर्ट आला म्हणजे सर्व काही ठीक आहे असे नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 29, 2026 | 01:14 PM
हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! 'हे' छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! 'हे' छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Follow Us
Follow Us:

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेताना बहुतांश व्यक्ती कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण, कोलेस्ट्रॉल पातळी नॉर्मल असल्याचा रिपोर्ट आला म्हणजे सर्व काही ठीक आहे असे नाही. रक्तदाब, रक्तातील साखर, कौटुंबिक इतिहास, झोप, जळजळ आणि इतर चयापचय घटक यांमुळे देखील हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. भारतातील एकंदरीत परिस्थिती चिंताजनक आहे. आयसीएमआर-इंडियाब (ICMR-INDIAB) च्या संशोधनानुसार, तपासणी केलेल्या प्रौढांपैकी ११.४ टक्‍के व्यक्तींमध्ये मधुमेह, १५.३ टक्‍के व्यक्तींमध्ये प्री-डायबिटीज, ३५.५ टक्‍के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि ८१.२ टक्‍के व्यक्तींमध्ये डिस्लिपिडेमिया आढळून आला. या आकडेवारीवरून निदर्शनास येते की, हृदयाच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

 

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे डायरेक्टर अँड सीनियर कन्सल्टंट डॉ. राजीव सेठी म्हणाले, “हृदयाचे आरोग्यावर कोलेस्ट्रॉल व्यतिरिक्त इतर अनेक घटकांचा देखील परिणाम होतो. कौटुंबिक इतिहास, रक्तदाब, रक्तातील साखर, झोप, शरीरातील जळजळ आणि इतर चयापचय घटक यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, ज्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.”

कौटुंबिक इतिहास महत्त्वाचा

आई-वडिलांना किंवा भावंडांना कमी वयात हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोक आला असेल, तर त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी अहवाल नॉर्मल आले तरी कौटुंबिक इतिहासामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जनुकीय रचना देखील लाइपोप्रोटीन(ए) म्हणजेच एलपी(ए) च्या प्रमाणावर परिणाम करू शकते. हा कोलेस्ट्रॉलशी संबंधित घटकांचा प्रकार आहे, जो प्रामुख्याने अनुवंशिक असतो आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. जीवनशैलीशी संबंधित इतर घटकांपेक्षा वेगळे म्हणजे, आहार किंवा व्यायामाने एलपी(ए)च्या प्रमाणात मोठा बदल होत नाही. हृदयविकाराचा तीव्र कौटुंबिक इतिहास असलेल्या किंवा हृदयविकाराचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींनी ही चाचणी करणे आवश्यक आहे.

स्पष्ट लक्षणे न दिसताही हृदयविकार उद्भवू शकतो

लक्षणे दिसण्याच्या खूप आधीपासूनच धमन्यांमध्ये प्लाक साचू लागत असल्याने अनेकदा हृदयविकार हळूहळू वाढत जातो. अधिक तपासणीची गरज असल्यास, डॉक्टर काही विशेष इमेजिंग चाचण्यांचा वापर करू शकतात. यामध्ये कॅल्शियमयुक्त प्लाक शोधण्यासाठी कोरोनरी आर्टरी कॅल्शियम (सीएसी) स्कोरिंग किंवा धमन्यांमधील अरुंदपणा पाहण्यासाठी सीटी कोरोनरी अँजिओग्राफी (सीसीटीए) यांसारख्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात. पण, या चाचण्या प्रत्येकासाठी सरसकट वापरण्याजोग्या नसल्यामुळे डॉक्टर रुग्णाचे वय, धोक्याचे घटक, लक्षणे आणि वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार त्यांचा सल्ला देतात.

रक्तदाब आणि रक्तातील साखरेकडे लक्ष देणे गरजेचे

रक्तदाब, रक्तातील साखर आणि ट्रायग्लीसराईड्स यांसारखे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित प्रमुख घटक कोणतीही लक्षणे न दाखवता बिघडू शकतात. उच्च रक्तदाबाची समस्या तर अत्यंत लुप्त असते. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतात २२० दशलक्ष व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, पण त्यापैकी केवळ जवळपास १२ टक्‍के व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच, रक्तातील साखर मधुमेहाच्या पातळीपर्यंत पोहोचण्याआधी हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. त्यामुळे इतर घटकांबरोबरच फास्टिंग ग्लुकोज आणि HbA1c यांसारख्या नियमित चाचण्या केल्यास लवकर निदान मिळू शकते.

झोप, ताणतणाव आणि जळजळ यांचा हृदयावर परिणाम

आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक दुर्लक्षित घटकांचा हृदयाच्या आरोग्यावर मुख्यत्वे परिणाम होतो. अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब, चयापचयाशी संबंधित समस्या, लठ्ठपणा आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता असते, म्हणून नियमितपणे पुरेशी झोप घ्या. दीर्घकालीन दाहामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि ॲथेरोस्क्लेरोसिस, म्हणजेच धमन्यांमध्ये प्लाक साचण्याची प्रक्रिया वेगाने होते. तसेच, शहरातील हवेचे प्रदूषण आणि सूक्ष्म धुलीकणांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे हृदय आणि चयापचयाशी संबंधित धोके वाढतात, त्यामुळे बाहेरील प्रदूषणापासून संपर्क टाळल्यास हृदयाचे रक्षण होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा : उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

रिपोर्ट “नॉर्मल” आला म्हणून हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

हृदयाच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी ही केवळ कोलेस्ट्रॉलपुरती मर्यादित नसते. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, कमरेचा घेर, धूम्रपानाची सवय, झोपेच्या सवयी, कौटुंबिक इतिहास आणि पूर्वीपासून असलेले आजार या मुख्य घटकांचे मूल्यमापन केले जाते. रुग्णाच्या वैयक्तिक धोक्याची पातळी पाहून, डॉक्टर नेहमीच्या स्क्रिनिंगऐवजी सखोल वैद्यकीय निदानासाठी एलपी(ए), एपीओबी, सीएसी स्कोरिंग किंवा सीटी कोरोनरी अँजिओग्राफी (सीसीटीए) यांसारख्या विशिष्ट चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. एकाच घटकावर विसंबून न राहता हृदयविकाराच्या सर्वंकष धोक्याचे मूल्यमापन केल्यास वेळेत निदान आणि योग्य उपचार शक्य होतात.

Web Title: Doctors have urged people to take care of their heart health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • healthy heart
  • heart attack
  • World Heart Day news

संबंधित बातम्या

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’
1

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

जागतिक हृदय दिनानिमित्त Lilavati Hospital कडून मोफत हृदय आरोग्य शिबीर! 1500 हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी
4

जागतिक हृदय दिनानिमित्त Lilavati Hospital कडून मोफत हृदय आरोग्य शिबीर! 1500 हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.