Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

Heart Attack News: पुण्यात 'दिवाळी पहाट' मैफलीत मृदंग वादन करत असतानाच ५६ वर्षीय प्रख्यात वादक श्रीधर पार्थसारथी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; शंकर महादेवन यांच्यासह संगीत जगतावर पसरली शोककळा!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 07, 2026 | 11:48 AM
Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात ‘दिवाळी पहाट’ मैफलीत मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी (५६) यांचे निधन
  • दिग्गजांसोबत केली साथसंगत
  • संगीत जगतात शोक; महादेवनकडून श्रद्धांजली
Heart Attack News: भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देशातील प्रख्यात आणि ज्येष्ठ मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचे पुण्यात एका मैफलीदरम्यान अचानक निधन झाले. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. संगीताची सेवा करत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण संगीत विश्वामध्ये शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!

वादन करतानाच आला हृदयविकाराचा झटका

पुण्यातील बाणेर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका ‘दिवाळी पहाट’ मैफलीमध्ये श्रीधर पार्थसारथी मृदंग वादन करत होते. सादरीकरण रंगात आले असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. व्यासपीठावरच ते कोसळल्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

दिग्गजांना साथ अन् समृद्ध संगीत प्रवास

श्रीधर पार्थसारथी यांचा संगीत प्रवासातील योगदान मोलाचे राहिला आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. प्रसिद्ध संगीत गुरू विद्वान कारैकुडी आर. चंद्रमौळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मृदंग वादनाचे बारकावे आत्मसात केले. त्यांनी डी. के. पट्टम्मळ, विद्वान मदुराई जी. एस. मणी, डॉ. एम. बालमुरलीकृष्ण आणि विद्वान रंगनाथ शर्मा यांसारख्या भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांसोबत साथसंगत केली. याशिवाय शंकर महादेवन, संजीव अभ्यंकर, रतनमोहन शर्मा आणि नंदकिशोर मुळे यांच्यासमवेत त्यांच्या जुगलबंदीच्या मैफली अत्यंत गाजल्या होत्या.

हेही वाचा:Pune Murder Case: मित्राचाच निघाला काळ! दारूच्या नशेत केली निर्घृण हत्या, धड अन् पाय वेगळे करून वेगवेगळ्या गल्लीत फेकले!

“हे पचवणे अशक्य!” – शंकर महादेवन भावुक

श्रीधर पार्थसारथी यांच्या निधनाची बातमी समजताच संगीत जगतातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. “हे वृत्त पचवणं अत्यंत कठीण आहे. हे संपूर्ण संगीत विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा माझी पहिली कर्नाटक शास्त्रीय संगीताची मैफल केली होती, तेव्हा माझ्या पाठीशी मृदंगावर श्रीधरच होता. एका जिवंत मैफलीत वादन करत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला, यापेक्षा विलक्षण काय असू शकते!” अशा शब्दांत महादेवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रीधर पार्थसारथी यांचे निधन कुठे आणि कसे झाले?

    Ans: पुण्यातील बाणेर येथे आयोजित 'दिवाळी पहाट' मैफलीमध्ये मृदंग वादन करत असतानाच त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला व रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

  • Que: श्रीधर पार्थसारथी हे कोणत्या वाद्याच्या वादनासाठी प्रसिद्ध होते?

    Ans: ते भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रख्यात आणि लोकप्रिय मृदंगवादक होते.

  • Que: गायक शंकर महादेवन यांनी त्यांच्या निधनावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: शंकर महादेवन यांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहून हा संपूर्ण संगीत विश्वासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आणि सुमारे ४० वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Pune heart attack sreedhar parthasarathy passes away diwali pahat concert sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • diwali news
  • heart attack
  • Indian Classical Music
  • Indian Music
  • Latest pune news update
  • Passed

संबंधित बातम्या

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण
1

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ
2

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!
4

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.