
फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
फळे खाण्याची पद्धत आणि वेळ?
लिव्हरचे आरोग्य कशामुळे बिघडते?
कोणत्या फळांच्या सेवनामुळे लिव्हरला हानी पोहचते?
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम थेट शारीरिक आरोग्यावर दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. कारण पित्त तयार करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे यांसारखी पन्नासपेक्षा जास्त कामे लिव्हर करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर, लिव्हर सोरायसिस यांसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. फ्रक्टोज प्रक्रिया केलेले अन्न, साखर, साखरेची गोड पेये यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
सॉफ्ट ड्रिंक्स, पॅक केलेले गोड ज्यूस आणि इतर साखरेची पेये प्यायल्यामुळे शरीरात अनावश्यक साखर जमा होण्यास सुरुवात होते. ज्याच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचते. अनावश्यक साखरेचे सेवन केल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जातात. जास्त साखरेचे सेवन केल्यामुळे फॅटी लिव्हर आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढून आरोग्य बिघडून जाते. कॅलरीजचे प्रमाण, वजन आणि आहारात सतत होणारे बदल लिव्हरच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. त्यामुळे दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे फार आवश्यक आहे.
फळांमध्ये नैसर्गिक फ्रक्टोजसोबत भरपूर फायबर, पाणी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. फळांमध्ये असलेल्या फायबर युक्त घटकांमुळे अन्नपदार्थ पचन होण्याचा आणि खाण्याचा वेळ मंदावतो. याशिवाय फळांमधील साखर रक्तामध्ये किंवा यकृतामध्ये शोषली जात नाही. फळांचे ज्यूस बनवल्यानंतर त्यातील आवश्यक फायबर निघून जाते. त्यामुळे फळांचा ज्यूस पिण्याऐवजी अख्या फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला पोषण मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
लिव्हरचे आरोग्य केवळ एका पदार्थामुळे नाहीतर अतिरिक्त कॅलरीज, साखरेची पेये, अतिप्रक्रिया केलेले अन्न, व्यायामाचा अभाव आणि चयापचया क्रिया बिघडल्यामुळे सुद्धा लिव्हर खराब होण्याची जास्त शक्यता असते. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर पोटात वाढलेल्या वेदना, डोळ्यांमधील पिवळेपणा किंवा थकवा, अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे.
Ans: सामान्य प्रमाणात पूर्ण फळे खाल्ल्याने लिव्हरवर चरबी जमा होते असे थेट म्हणता येत नाही. मात्र अतिप्रमाणात कॅलरी आणि साखरेचे सेवन केल्यास वजन वाढून फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.
Ans: होय. फॅटी लिव्हर असतानाही प्रमाणात पूर्ण फळांचे सेवन करता येते. फळांमधील फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक आहारासाठी फायदेशीर ठरतात.
Ans: फळे दिवसातील कोणत्याही सोयीच्या वेळी खाता येतात. मात्र मुख्य जेवणाऐवजी किंवा संतुलित आहाराचा भाग म्हणून पूर्ण फळ खाणे अधिक योग्य ठरते.