
मांसाहार खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात करा बदल, पोट होईल स्वच्छ
मूळव्याधीची लक्षणे?
मूळव्याध होण्याची कारणे?
मूळव्याध झाल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत?
हल्ली मूळव्याध होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. कारण लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणालाही मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. गुदाशयाच्या खालील भागातील किंवा गुदद्वाराजवळील रक्ताच्या वाहिन्यांवर दाब वाढल्याने सूज येते. आपल्यातील अनेकांना कायमच वाटतेकी मांसाहारी किंवा तिखट तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे मूळव्याध वाढतो. पण हा एक गैसमज आहे. मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण केवळ मांसाहारी पदार्थ नाहीतर आहारातील फायबरची कमतरता, बद्धकोष्टता आणि शौचाच्या वेळी जास्त जोर लावणे इत्यादी आहेत. चिकन, मासे किंवा अंडी हे पदार्थ शरीरात थेट मूळव्याध निर्माण करत नाही. जीवनशैलीत होणारे बदल आणि पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका
मूळव्याध झाल्यानंतर बऱ्याचदा वेळेत लक्ष दिले जात नाही. ज्याच्या परिणामामुळे शौचाच्या वेळी वेदना होणे, रक्त पडणे, सूज येणे आणि बसताना तीव्र अस्वस्थता होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे फायबरची कमतरता आणि खूप कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील मल बाहेर काढून टाकण्यासाठी खूप जास्त जोर लावावा लागतो. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जात आणि नाजूक अवयवांमध्ये खूप जास्त वेदना होतात. आज आम्ही तुम्हाला सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात कोणते बदल करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता आणि शौचाच्या वेळी जास्त जोर लावल्यामुळे स्नायूंवर तणाव येतो. चिकन, मासे, अंडी किंवा मटण थेट मूळव्याधास होण्यास कारणीभूत ठरत नाहीत. पण चिकन, मटण खाल्ल्यानंतर त्रास होत असेल तर योग्य प्रमाणात मांसाहारी पदार्थ खावेत. आहारात फळे, भाज्या, डाळी आणि धान्यांसारख्या फायबर युक्त पदार्थांचा समावेश न केल्यास बद्धकोष्ठता वाढते. तसेच लाल मटण किंवा प्रोसेस्ड मीट खाल्ल्यामुळे सुद्धा मूळव्याधीचा त्रास होण्यास सुरुवात होते आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे मांसाहारी पदार्थ मूळव्याध होण्यास कारणीभूत ठरत नाहीत.
मूळव्याध झालेल्या रुग्णांनी चिकन, मटण खाल्ल्यास जळजळ जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध असलेल्या लोकांनी आहारात कमीत कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. आहारातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण उत्तम असल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळते. दिवसभरात खूप कमी पाणी पिणे, सतत बसून राहण्याची जीवनशैली, लठ्ठपणा, गर्भावस्था आणि वारंवार वजनदार वस्तू उचलणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
वजन कमी करण्यासाठी मध-कोमट पाणी खरंच फायदेशीर? की फक्त ट्रेंड; जाणून घ्या सत्य
मूळव्याध झाल्यानंतर ओट्स, ब्राऊन राईस, गव्हाचा दलिया, सफरचंद, पपई, ब्रोकोली, पालक, गाजर, मुगाची डाळ, हरभरे, अळशी, चिया सीड्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटाला आराम मिळतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. याशिवाय नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमधील विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. टॉयलेटमध्ये जास्त वेळ न घालवणे, नियमित व्यायाम करणे आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे फार आवश्यक आहे.
Ans: नाही. केवळ मांसाहारामुळे मूळव्याध होत नाही. मात्र कमी फायबरयुक्त आहार, बद्धकोष्ठता, पुरेसे पाणी न पिणे आणि शौचाला जास्त वेळ लावणे यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: फायबरयुक्त फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, ओट्स आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश करावा. यामुळे शौच मऊ राहण्यास मदत होते.
Ans: सुरुवातीच्या अवस्थेत आहारातील बदल, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि बद्धकोष्ठता टाळल्याने लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते. मात्र गंभीर किंवा दीर्घकाळ त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.