Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Diabetes: दैनंदिन आहारात ताज्या फळांचे सेवन केले जाते. पण फळांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे फळे खाताना कायमच ती कापून खावीत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2026 | 08:13 AM
'या' फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

'या' फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Follow Us
Follow Us:

कोणत्या फळांच्या सेवनामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते:
फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत?
मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

Diabetes: भारतासह जगभरात सगळीकडे मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आहारात होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर अंगाला खाज येणे, वारंवार लघवीला होणे, चक्कर येणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये या लक्षणांकडे सुद्धा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?

आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. ताजी फळे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी आवश्यक घटक मिळतात. संतुलित आहारात फळांचा सुद्धा समावेश केला जातो. पण काही फळांमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. त्यामुळे फळांचे सेवन करताना योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या फळांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि फळे खाण्याची योग्य पद्धत.

कोणत्या फळांच्या सेवनामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते:

आंबा:

वर्षातून एकदाच बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतात. फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा केवळ भारतातच नाहीतर जगभरात फेमस आहे. त्यामुळे आवडीने आंब्याचे सेवन केले जाते. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आंबा कापून खावा. मिल्कशेक किंवा रस बनवून प्यायल्यास रक्तात साखरेचे प्रमाण लगेच वाढते.

केळी:

केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वजन वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जेवढी मोठी केळी तितकेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी लहान आकाराची केळी खावी. केळ्यांचे सेवन सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी करावे.

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

खजूर:

नियमित एक किंवा दोन खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर हा सुकामेव्याचा प्रकार आहे. यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एका वेळी एक किंवा दोनच खजूर खावेत. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी फळाचे सेवन करताना योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणती फळे खाल्ल्याने Diabetes चा धोका वाढतो?

    Ans: फळे पूर्णपणे टाळण्याची गरज नसते. मात्र खूप मोठ्या प्रमाणात गोड फळे किंवा फळांचा रस घेणे, तसेच एकावेळी जास्त प्रमाणात फळे खाणे यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

  • Que: मधुमेहाचा धोका असेल तर फळे खाऊ नयेत का?

    Ans: नाही. संपूर्ण फळांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक असतात. योग्य प्रमाणात संपूर्ण फळे आहाराचा भाग ठेवता येतात.

  • Que: Diabetes असताना कोणती फळे तुलनेने योग्य ठरू शकतात?

    Ans: पेरू, सफरचंद, संत्री, मोसंबी, बेरीज यांसारखी फायबरयुक्त फळे योग्य प्रमाणात घेता येतात. मात्र फळाची निवड आणि प्रमाण व्यक्तिनुसार बदलू शकते.

Web Title: Consuming these fruits may increase the risk of diabetes learn the right time and way to eat them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली
1

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.