Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिरिएड्समध्ये ‘फ्लो’ अचानक कमी होतो? कारणं जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 13, 2022 | 03:25 PM
पिरिएड्समध्ये ‘फ्लो’ अचानक कमी होतो? कारणं जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

मासिक पाळीदरम्यान प्रत्येकीला होणारा रक्तस्त्राव कमी- जास्त असतो. रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे चांगले किंवा वाईट असते, असे नाही. अनुवंशिकता, प्रत्येकीचे आरोग्य, खानपानाच्या सवयी, तब्येत, व्यायामाच्या सवयी यावरही मासिक पाळीचा रक्तस्त्राव अवलंबून असतो. पण एखाद्या महिन्यात नेहमीपेक्षा खूपच कमी रक्तस्त्राव होत आहे, असे जाणवले तर त्यामागे नक्कीच काही कारण असते हे लक्षात घ्या. प्रत्येकवेळी हे कारण चिंतेचेच असेल असे नाही. पण तरी अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.

मासिक पाळीत रक्तस्त्राव अचानक कमी होण्याची कारणे

  • थायरॉईड
थायरॉईड्स आणि मासिक पाळी यांचा जवळचा संबंध आहे. जर थायरॉईडच्या स्तरामध्ये काही बदल झाला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीतील रक्तस्त्रावावर होऊ शकतो. त्यामुळे असा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक असतील तेवढ्या थायरॉईड संदर्भातील चाचण्या करून घ्या.
  •  लोहाची कमतरता
जर आहारातून लोह खूपच कमी प्रमाणात मिळाले असेल, तरी त्याचा परिणाम पाळीतील रक्तस्त्रावावर होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि लोह जास्त प्रमाणात असलेले पदार्थ आहारात आवर्जून घ्या, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
  •  मनोपॉजकडे वाटचाल
जर तुमचे वय चाळिशीच्या आसपास असेल तर अचानकपणे कमी झालेला रक्तस्त्राव हे मेनोपॉजच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल असू शकते. फ्लो कमी प्रमाणात होण्यासोबतच जर झोपेवर परिणाम झाला असेल, रात्री घाबरून उठत असाल आणि घाम येत असेल, योनी मार्गात कोरडेपणा जाणवू लागला असेल, तर लवकरच येणारा मेनोपॉज हे एक कारण असू शकते.
  •  पीसीओडी, पीसीओएस
या दोन्ही प्रकारच्या त्रासांमध्ये मासिक पाळीतील रक्तस्त्रावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करा.

या कारणांमुळेही होऊ शकतो पाळीतील रक्तस्त्रावावर परिणाम

  • खूप जास्त मानसिक ताण आणि नैराश्य
  • हार्मोन्समध्ये झालेले बदल
  • असंतुलित आहार
  • खूप जास्त व्यायाम
  • स्थूलता

Web Title: Does flow suddenly decrease during periods find out the reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • Health Tips
  • period

संबंधित बातम्या

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
1

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
2

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’
3

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
4

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.