पावसाळ्यातील आर्द्रतामुळे त्वचा तेलकट होते? 'हे' घरगुती उपाय त्वचेसाठी ठरतील प्रभावी
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचा आणि केसांची योग्य काळजी घ्यावी. कारण चेहऱ्यावरील त्वचा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे स्किन केअर रुटीन फॉलो करताना कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी त्वचेला सूट होतील अशाच प्रॉडक्टचा वापर करावा. पावसाळ्यात सतत वातावरणात काहींना काही बदल होत असतात. या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. वातावरणातील आर्द्रतामुळे त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. चिकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, मुरूम येणे, त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स काही केलं तरीसुद्धा लवकर निघून जात नाहीत. पिंपल्स कमी झाल्यानंतर पिंपल्सचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात.(फोटो सौजन्य – iStock)
मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी ‘या’ दोन घरगुती पदार्थांचा करा वापर, मानेवर येईल ग्लोइंग चमक
वातवरणातील बदल, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण तशीच साचून राहते. ही घाण स्वच्छ न झाल्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स येऊ लागतात. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वापरले जणारे प्रॉडक्ट त्वचा अधिक कोरडी करतात तर काही प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचा अतिशय तेलकट होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये स्क्रब तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा स्क्रब चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार दिसू लागेल. स्क्रब तयार करण्यासाठी वाटीमध्ये पपई, दही आणि कॉफी घेऊन मिक्स करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे त्वचेवर साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल आणि चेहरा उजळदार दिसेल. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवडयातून दोनदा किंवा तीनदा केल्यास चेहरा चमकदार दिसू लागेल.
उन्हामुळे टॅन झालेली त्वचा पुन्हा चमकदार करण्यासाठी हळद आणि बेसनाचा वापर करून फेसपॅक तयार करावा. यासाठी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करा. नंतर त्यात मध आणि दूध घालून जाडसर पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे डेड स्किन कमी होईल आणि चेहरा उजळदार दिसू लागेल. फेसपॅक काहीवेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय नियमित केल्यास त्वचा सुंदर होईल.