Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घामामुळे शरीराला सतत खाज सुटते? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा खाजेपासून तात्काळ आराम, त्वचा होईल स्वच्छ

उन्हाळ्यात अंगावर आलेल्या खाजेपासून नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत आणि सतत थंड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2026 | 08:25 AM
घामामुळे शरीराला सतत खाज सुटते? 'हे' घरगुती उपाय करून मिळवा खाजेपासून तात्काळ आराम, त्वचा होईल स्वच्छ

घामामुळे शरीराला सतत खाज सुटते? 'हे' घरगुती उपाय करून मिळवा खाजेपासून तात्काळ आराम, त्वचा होईल स्वच्छ

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
चेहऱ्यावर रॅश आल्यानंतर उपाय?
साधं दूध पिण्याचे फायदे?

देशभरात सगळीकडे कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगाला खूप जास्त घाम येतो. घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते. पण थंड ठिकाणी किंवा पंख्याच्या खाली उभे राहिल्यानंतर अंगाला आलेला घाम सुकून जातो आणि शरीरावर घाणीचे कपटे तसेच राहतात. शरीरावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे सतत अंगाला खाज येणे, अंगावर लाल रॅश उठणे किंवा त्वचेवर इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या वाढल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेली घामोळ्याची किंवा थंड वाटणारी पावडर आणून ती लावतात. पण केमिकल युक्त पावडरचा वापर केल्यामुळे फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात अंगाला येणाऱ्या खाजीपासून नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

खराब पचन तुमची स्मरणशक्ती कमकुवत करू शकते; अभ्यासातून गट हेल्थ आणि मेंदूचा संबंध उघड झाला, वेळीच सावध व्हा!

खाजेपासून नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड दूध प्यावे. काहींना थंड दूध प्यायला अजिबात आवडत नाही. अशावेळी गरम केलेले दूध तुम्ही थंड करून सुद्धा पिऊ शकता. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला खूप जास्त घाम येतो. अशावेळी थंड पाणी न पिता दूध प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच शरीरात थंडावा टिकून राहील.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना वाढत्या उष्णतेमुळे पित्त आणि ऍसिडिटीचा खूप जास्त त्रास होतो. पित्त वाढल्यामुळे पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात आग झाल्यासारखे वाटते. याशिवाय काहींना सतत तोंड येणे, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंड दूध प्यावे. दूध प्यायल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.

अंगावर वाढलेल्या खाजेपासून नियंत्रण मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. मीठ टाकल्यामुळे शरीरावर वाढलेले विषाणू कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच अंघोळ करताना साबण वापरण्याऐवजी बॉडी वॉशचा वापर करावा. उन्हामुळे अंगावर जात घामोळं किंवा रॅश उठले असतील तर कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करावी. कडुलिंबाचे पाणी अंगावर वाढलेले जंतू नष्ट करण्यासाठी मदत करते.

मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ! धारावी, गोवंडी हॉटस्पॉट; लसीकरणाकडे करू नका दुर्लक्ष

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी सुद्धा प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर स्वच्छ राहील. आतड्यांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर तर काहीवेळा संपूर्ण शरीरावर मोठे मोठे पिंपल्स आणि खाज उठते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does the body itch constantly due to sweat get immediate relief from itching by doing this home remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
1

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
2

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
3

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
4

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.