
केस गळून पातळ झाले आहेत? मग 'या' पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
केसांच्या वाढीसाठी पारंपरिक तेल.
केसांची गुणवत्ता खराब होण्याची कारणे?
केसांची झपाट्याने वाढ होण्यासाठी या तेलाचा करा वापर?
Hair Care Tips: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. याशिवाय वारंवार हेअर केअर रुटीनमध्ये होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, केमिकल प्रॉडक्टचा अतिवापर इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांची काळजी घेताना योग्य हेअर केअर फॉलो करणे फार आवश्यक आहे. केस गळणे, केसांमध्ये कोंडा, टाळूवर वाढलेले इन्फेक्शन इत्यादी केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही करतात. पण वारंवार केलेल्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी घरगुती पदार्थांपासून तयार केलेल्या तेलाचा वापर करावा. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारेल आणि केस घनदाट, मजबूत होतील. चला तर जाणून घेऊया केसांच्या वाढीसाठी घरगुती तेल बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)
तयार केलेले तेल दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते. केसांच्या मुळांना खोलवर पोषण देण्यासाठी मेथी दाणे फायदेशीर ठरतात. मेथी दाण्यांमध्ये असलेले पोषक घटक टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करून स्कल्प स्वच्छ ठेवतात. कढीपत्त्याच्या पानांचा वापर केवळ जेवण बनवण्यासाठी नाहीतर केसांसाठी सुद्धा केला जातो. कढीपत्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे केसांचा काळा रंग कायम टिकून राहतो. तसेच नवीन केस उगवण्यास मदत होते.
Ans: काही तेलांमुळे टाळू आणि केसांना मॉइश्चरायझेशन मिळून केसांचा कोरडेपणा किंवा तुटणे कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र केवळ तेल लावल्याने केसांची घनता नक्की वाढेलच असे नाही.
Ans: नारळाचे तेल, बदाम तेल, आवळा, कढीपत्ता किंवा मेथीदाणे यांसारखे घटक घरगुती केसांच्या निगेसाठी वापरले जातात. कोणता घटक योग्य आहे हे केस आणि टाळूच्या प्रकारावर अवलंबून असते.
Ans: सामान्यतः आठवड्यातून १ ते २ वेळा तेल लावणे पुरेसे असू शकते. टाळू तेलकट असल्यास किंवा कोंडा असल्यास वारंवार तेल लावल्याने त्रास वाढू शकतो.