Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

वय वाढताना डोळ्यांखाली बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसणे सामान्य आहे. मात्र, कमी वयातच हा त्रास जाणवत असेल तर त्यामागे रोजच्या जीवनातील काही सवयी कारणीभूत असू शकतात. त्वचेची योग्य काळजी घेतल्यास या सवयींकडे वेळीच लक्ष देता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2026 | 08:15 PM
डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? 'या' सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा 'या' चुका!

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? 'या' सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा 'या' चुका!

Follow Us
Follow Us:
  • कमी वयात डोळ्यांखाली सुरकुत्या येण्यामागे कोणती कारणे असू शकतात?
  • मोबाईल, झोप आणि त्वचेतील हायड्रेशनचा सुरकुत्यांशी काय संबंध?
  • रोजच्या कोणत्या सवयी डोळ्यांखालील बारीक रेषा वाढवू शकतात?
वाढत्या वयाबरोबरच डोळ्यांखाली सुरकुत्या येऊ लागणे फार सामान्य गोष्ट आहे. डोळ्यांखाली येणाऱ्या या बारीक रेषा लहान असल्या आपल्याला वृद्धत्वाकडे घेऊन जाण्याचे ते काम करत असतात. वय वाढले तरी साैंदर्य टिकून रहावे अशी इच्छा तर प्रत्येकाची असते. बऱ्याचदा कमी वयातच डोळ्यांखाली सुरकुत्या येऊ लागतात ज्यामुळे अनेकांच्या मनात चिंता वाढते. पण तुम्हाला माहितीये का? रोजच्या जीवनात केल्या जाणाऱ्या काही चुका खरंतर या सुरकुत्या येण्याला जबाबदार ठरत असतात. जसं की, त्वचेतील हायड्रेशनकडे लक्ष न देणे आणि डोळे लहान करुन बोलणे इ. आज या लेखात आपण असे कोणते घटक आहेत जे सुरकुत्या वाढवण्यास प्रभावी ठरतात आणि या सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरु शकतात ते आपण सविस्तर जाणून घेऊन जाणार आहोत.

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

कमी वयात सुरकुत्या येण्याचे कारण?

त्वचा अत्यंत पातळ असणे
डोळ्यांखालील त्वचा ही फार नाजूक आणि पातळ असते. हेच कारण आहे की, हा भाग फार लवकर कोरडा होऊ लागतो. अशावेळी तीव्र सूर्यप्रकाश आणि वातावरणातील बदल अशा अनेक घटकांचा यावर वाईट परिणाम होत असतो आणि यामुळेच डोळ्यांखाली सुरकुत्या येण्यास सुरुवात होते.

डोळे लहान करुन बोलण्याची सवय
काही लोकांना आपले डोळे लहान करुन बोलण्याची सवय असते. याशिवाय सूर्यप्रकाशातही आपल्याला संपूर्ण डोळे उघडे करता येत नाहीत ज्यामुळे डोळे लहान करुन पहावे लागतात. याशिवाय वारंवार पापण्या उघड-बंद करणे, ज्यामुळे डोळ्यांच्या कडा बारीक होऊ लागतात आणि इतर अनेक प्रकारचे चेहऱ्यावरील हावभाव यामुळेही डोळ्यांखालील सुरकुत्या वाढतात.

त्वचेत डिहायड्रेशन वाढणे
डोळ्यांच्या आसपासची त्वचा पातळ आणि नाजूक असल्यामुळे या जागी हायड्रेशनचे प्रमाण फार कमी असते. अशात ही पाण्याची कमतरता दूर न झाल्यास डोळ्यांखाली सुरकुत्या लवकर येऊ लागतात. आपल्याला हे ध्यानात ठेवावे लागेल की, सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स या कोरड्या त्वचेवर लवकर येतात.

झोप पूर्ण न होणे
जर सतत तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्वचेला रिपेअर करण्यासाठी फारचा वेळ मिळत नाही. यासोबतच झोपेच्या कमतरतेमुळे येणारा थकवा डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्यांना जबाबदार ठरत असतो.

स्क्रिनचा अतिवापर
जर तुम्ही दररोज स्क्रिनसमोर बसून काम करत असाल तर यामुळेही सुरकुत्या येऊ शकतात हे लक्षात घ्या. लॅपटाॅप किंवा मोबाईलचा अतिवापर आणि यातून उत्सर्जित होणारी ब्यू लाईट यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो ज्यामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या येऊ लागतात.

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

या सवयींमुळेही येऊ शकतात डोळ्यांखाली सुरकुत्या

  • वारंवार डोळे चोळणे
  • धुम्रपानाचे सेवन
  • मद्यापानाचे सेवन
  • झोपण्याच्या अशा सवयी ज्यामुळे चेहऱ्यावर दाब पडतो आणि तो सैल पडतो.

Web Title: Under eye wrinkles causes and daily habits that may increase fine lines at young age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
3

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
4

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.