Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस धुतल्यानंतर खूप जास्त गळतात? जावेद हबीब यांनी सांगितलेली केस धुवण्याची सोपी पद्धत, केसांची होईल वाढ

केस स्वच्छ धुवण्यासाठी कायमच सौम्य शँम्पूचा वापर करावा. वारंवार केमिकलयुक्त शँम्पू किंवा साबणाचा वापर केल्यामुळे केसांना हानी पोहचते आणि केस अतिशय नाजूक होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 10, 2025 | 10:05 AM
केस धुतल्यानंतर खूप जास्त गळतात? जावेद हबीब यांनी सांगितलेली केस धुवण्याची सोपी पद्धत

केस धुतल्यानंतर खूप जास्त गळतात? जावेद हबीब यांनी सांगितलेली केस धुवण्याची सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:

प्रत्येकालाच अतिशय घनदाट आणि काळेभोर केस हवे असतात. सुंदर केसांसाठी अनेक वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट किंवा शॅम्पूचा वापर केला जातो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण केस व्यवस्थित धुतले नाहीतर कोणतेही प्रॉडक्ट किंवा ट्रीटमेंट केसांसाठी प्रभावी ठरणार नाहीत. केस व्यवस्थित न धुतल्यामुळे टाळूवरील इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय केसांमध्ये कोंडा वाढतो, ज्यामुळे केस गळणे, केस कोरडे पडणे किंवा केस पांढरे होण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला वारंवार दुर्लक्ष करतात. पण केसांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आणि हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस धुवण्याची सोपी पद्धत सांगितली आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. योग्य पद्धतीने केस धुतल्यास केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतील.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या पन्नाशीत अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच दिसते तरुण! सौंदर्य टिकवण्यासाठी ‘या’ सवयी नियमित करा फॉलो, त्वचा राहील तेजस्वी

केस कसे धुवावेत:

जावेद हबीब यांनी सांगितल्यानुसार, केस स्वच्छ ठेवण्यासाठी केस व्यवस्थित धुवणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने केस धुतल्यास केसांच्या समस्या वाढू लागतात. यामुळे केस आठवड्यातून दोनदा व्यवस्थित स्वच्छ धुवावेत. केस धुवण्यासाठी प्री कंडिशनिंग करणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्यात आधी केस व्यवस्थित ओले करून घ्या. त्यानंतर केसांना तेल लावा. तेल लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटं मसाज करून झाल्यानंतर काहीवेळ केस तसेच ठेवून द्या.

डोके स्वच्छ करण्यासाठी केस शॅम्पूच्या सहाय्य्यने स्वच्छ धुवून घ्यावे. केस धुवण्यासाठी तुम्ही साबणाचा सुद्धा वापर करू शकता. शिकेकाई, आवळा, रिठा इत्यादी पदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा किंवा पावडरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. याशिवाय केस व्यवस्थित स्वच्छ होतात. केसांच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करावा.

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या ‘या’ हेअरमास्कचा करा वापर, दिसाल अधिक तरुण

केसांची काळजी कशी घ्यावी:

केसांची काळजी व्यवस्थित काळजी घेतल्यास केस अतिशय सुंदर दिसतात. वारंवार केसांवर मशीन किंवा हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होऊन जातात. त्यामुळे केसांसंबधित समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष करू नये. केस धुण्यासाठी जेंटल शॅम्पूचा वापर करावा. यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. याशिवाय केस स्वच्छ धुतल्यानंतर केसांना जास्त जोरात स्पर्श करू नये. यामुळे केसांना हानी पोहचते.नैसर्गिक पद्धतीने केस सुकवावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does your hair shed a lot after washing javed habibs simple method of washing hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • Javed Habib

संबंधित बातम्या

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
1

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
2

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
3

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.