Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार आजारपणात डोलो गोळीचे सेवन केल्यास लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. यामुळे लिव्हर निकामी होऊन जाईल. चला तर जाणून घेऊया डोलो ६५० खाण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 17, 2025 | 11:21 AM
Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील 'ही' गंभीर लक्षणे

Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

डोलोच्या गोळीचे शरीरावर दिसून येणारे गंभीर परिणाम?
पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे लिव्हरवर कोणते परिणाम होतात?
डोलोची गोळी आरोग्यासाठी का घातक आहे?

वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी खोकला, ताप, जुलाब, उलट्या किंवा आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. शरीरात आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी मेडिकलमधील गोळी आणून खाल्ली जाते. पण मेडिकलमधील गोळ्यांचे वारंवार सेवन केल्यामुळे किडनी आणि लिव्हर खराब होते. मेडिकलमधील गोळ्या काहीवेळा एक्सस्परी झालेल्या असतात, तर काहीवेळा चुकीच्या गोळ्या सुद्धा दिल्या जातात. त्यामुळे वारंवार ताप, सर्दी, खोकला होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)

महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार

थोडी कणकण आहे, डोकं दुखतंय किंवा शरीरात कुठेही वेदना होत असेल तर आपल्या भारतात डॉक्टरांना न विचारता एक गोळी डोळे झाकून सर्वात जास्त घेतो, ती म्हणजे डोलो-६५०. अलीकडेच हो गोळी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. अमेरिकेमधील गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट व हेल्थ एज्युकेटर डॉ. पलानीअप्पन मणिकम यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, “भारतीय डोलो ६५० कॅडबरी जेम्ससारखी खातात.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांच्या औषधं वापरण्याच्या सवयींवर पुन्हा चर्चा सुरू झाली.

डॉक्टरांच्या मते, ही गोळी ताप आणि इतर वेदनांवर परिणामकारक असली तरी पॅरासिटामोल जास्त प्रमाणात घेतलं किंवा गरज नसताना सुद्धा घेतलं तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. युनायटेड किंगडमच्या नॅशनल हेल्थ सर्विस (एनएचएस) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रौढ व्यक्तींनी एकावेळी ५०० एमजीच्या एका किंवा दोन गोळ्या घेतल्या पाहिजेत. इतकंच नाही तर २४ तासांत ८ पेक्षा जास्त गोळ्या घेतल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात औषधं घेऊ नका.

साईड इफेक्ट्स आणि लिव्हरवर परिणाम पॅरासिटामोल योग्य प्रमाणात नाही घेतला आणि ओव्हरडोस झाला तर त्याचे शरीरावर साइड इफेक्ट्स होतात. त्वचेवर पुरळ येणे, अंगावर खाज सुटणे, घशात सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणं दिसून येतात. आणि जर जास्त कालावधीसाठी तुम्ही अति सेवन केलं तर लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे:

  • पॅरासिटामोलच्या ओव्हरडोसमुळे लिव्हर डॅमेज झाल्यावर पुढील काही लक्षणं दिसून येतात.
  • अचानक वजन कमी होणे
  • भूक मंदावणे
  •  डोळे पिवळे पडणे
उच्च रक्तदाबाच्या गोळ्या होतील एका झटक्यात बंद! ‘या’ पद्धतीने नियमित खा लसूण पाकळ्या, रक्तवाहिन्या होतील मुळांपासून स्वच्छ

चुकूनही करू नका ही चूक:

अनेकजण हलगर्जीपणा करत गोळ्यामध्ये असलेले कंटेंट वाचत नाहीत. पण त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा की पॅरासिटामोल असलेल्या इतर औषधांसोबत पुन्हा पॅरासिटामोल घेऊ नका. असं केलं तर अनवधानाने ओव्हरडोस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हलकाच ताप असेल तर आधी विश्रांती घ्या, पुरेस आहार घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर डॅमेज म्हणजे काय?

    Ans: यकृत इतके खराब होते की ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याची, पचनास मदत करण्याची आणि ऊर्जा निर्माण करण्याची त्याची क्षमता कमी होते.

  • Que: लिव्हर डॅमेजची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: थकवा आणि अशक्तपणा, ओटीपोटात सूज (जलोदर) आणि वेदना

  • Que: लिव्हर डॅमेजची मुख्य कारणे काय आहेत?

    Ans: दीर्घकाळ जास्त प्रमाणात दारू पिल्याने लिव्हरच्या पेशी नष्ट होतात आणि सिरोसिस होतो.

Web Title: Dolo overdose extremely harmful for liver these serious symptoms health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health Care Tips
  • Medicines Issue

संबंधित बातम्या

‘या’ व्यक्तींनी रोजच्या आहारात चुकूनही करू नका काकडीचे सेवन, तब्येत सुधारण्याऐवजी आणखीनच जाईल बिघडून
1

‘या’ व्यक्तींनी रोजच्या आहारात चुकूनही करू नका काकडीचे सेवन, तब्येत सुधारण्याऐवजी आणखीनच जाईल बिघडून

महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार
2

महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार

दारू पिण्याची खरी मज्जा सकाळी की रात्री? शरीरासाठी कोणता पर्याय ठरेल कमी हानिकारक? जाणून घ्या सविस्तर
3

दारू पिण्याची खरी मज्जा सकाळी की रात्री? शरीरासाठी कोणता पर्याय ठरेल कमी हानिकारक? जाणून घ्या सविस्तर

सकाळी उठल्यानंतर नियमित करा पालक बीटच्या रसाचे सेवन, शरीरसंबंधित गंभीर समस्या कायमच्या होतील दूर
4

सकाळी उठल्यानंतर नियमित करा पालक बीटच्या रसाचे सेवन, शरीरसंबंधित गंभीर समस्या कायमच्या होतील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.